Friday, September 27, 2024

Latest Posts

Shardiya Navratri 2024: नवरात्रीमध्ये हिरव्या रंगात रंगलेल्या अभिनेत्रींचा पहा खास लूक

नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास आणि अर्चना करतात. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालण्याचे विशेष महत्व आहे. हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे. हिरवा रंग स्वाभिमानाचा, सृजनशक्तीचा , सौभाग्याचा धारणाशक्तीचा, प्रकृतीचा निदर्शक आहे. सौभाग्याशी हिरव्या रंगाचं अतूट असं नातं आहे.

हिंदू दिनदर्शिकेनुसार शारदीय नवरात्र उत्सव दरवर्षी शरद ऋतूमध्ये अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरु होते. नवरात्रीचे विशेष महत्व आहे. यावर्षी शारदीय नवरात्री ३ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस भक्त दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करतात आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील करतात. असे मानले जाते की, दुर्गा देवीची नऊ दिवस भक्तिभावाने पूजा केल्याने ती आनंदी होते आणि भक्तांचे सर्व त्रास दूर होतात. नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास आणि अर्चना करतात. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालण्याचे विशेष महत्व आहे. हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे. हिरवा रंग स्वाभिमानाचा, सृजनशक्तीचा , सौभाग्याचा धारणाशक्तीचा, प्रकृतीचा निदर्शक आहे. सौभाग्याशी हिरव्या रंगाचं अतूट असं नातं आहे. खास नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हिरव्या रंगाच्या साडी आणि ड्रेसमधील काही अभिनेत्रींचे काही फोटो शेअर केले आहेत.

प्राजक्ताने सोशल मीडियावर ‘फुलवंती’ चित्रपटातील मदनमंजिरी गाण्यामधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ताने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.
मराठमोळ्या पद्धतीचा हिरव्या साडीतील पूजा सावंतचा लूकने सर्वांचे मन जिंकून घेतले आहे. या जरीकाठाच्या साडीत पूजा अत्यंत सुंदर आणि लक्षवेधी दिसत आहे.
सई ताम्हणकरच्या हिरव्या रंगातल्या फॅन्सी साडीने तिचा ग्लॅमरस आणि बोल्ड लूक शोभून दिसत आहे.
सायली संजीव या मराठी अभिनेत्रीने हिरव्या साडीत पारंपरिक दागिने घातले आहेत. या पारंपरिक लूकमध्ये चाहत्यांची लाडकी अभिनेत्री झाली आहे.
एव्हर ग्रीन असणाऱ्या प्रिया बापट या अभिनेत्रीने हिरव्या साडीवर स्लिव्हलेस ब्लाऊज घातला आहे आणि कानात झुमके घातले आहेत.
सर्वांची लाडकी तेजश्री प्रधान या अभिनेत्रीने ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनातच नाही घराघरात स्थान मिळवलं. तिच्या हिरव्या साडीतील या फोटोने प्रेक्षकांचे मन वेधून घेतले आहे.

हे ही वाचा:

Shardiya Navratri 2024: यंदाच्या नवरात्रीनिमित्त बनवा खास उपवासाचा बटाटेवडा रेसिपी…

Shardiya Navratri 2024: नवरात्री का साजरी केली जाते? काय त्याचे महत्त्व? जाणून घ्या सविस्तर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss