Thursday, September 26, 2024

Latest Posts

Shardiya Navratri 2024 : पिवळ्या रंगात सजल्या मराठी अभिनेत्री; यंदा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्हीही करू शकता अश्याप्रकारे स्टाईल…

Shardiya Navratri 2024 : नवरात्री म्हंटलं का सगळीकडे प्रत्येक दिवसाचा खास रंग सर्वांच्या कपड्यांमध्ये दिसत असतो. विशेषतः महिलांना याचे खूपच आकर्षण असते. तसेच अभिनेत्री सुद्धा विशिष्ट रंगांमध्ये साड्या नेसून फोटोशूट करत असतात. विविध अभिनेत्री नवरात्रीनिमित्त आपले खास फोटोशूट करतात. त्यांच्यासारखी खास स्टाईल वापरून तुम्हीही या उत्सवात तयार होऊ शकता. आज पिवळ्या रंगानिमित्त आपण त्यांचे विविध लुक पाहू. पिवळा रंग हा सकारात्मकता, समृद्धी आणि तेजस्वीपणाचे प्रतीक आहे.

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी पिवळ्या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. त्यावर पारंपरिक असे दागिने आणि हातात हिरव्या बांगड्या तिने परिधान केल्या आहेत. तसेच सोबत नाकात नाजूक नथ घातली आहे.
अभिनेत्री ऋतुजा बागवे हिचा पिवळ्या साडीत सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. त्यावर तिने पारंपरिक कोल्हापुरी साज, ठुशी, बांगड्या, आणि नाकात नव्या पद्धतीची नथ घातली आहे. हे फोटो चाहत्यांना अतिशय आवडले आहेत.
सर्वांची लाडकी अभिनेत्री सायली संजीवचा पिवळ्या रंगातील सलिव्हलेस ड्रेस खूपच सुंदर दिसतो. ज्यावर तिने ऑक्सडाइज ज्वेलरी परिधान केली आहे.
लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे पिवळ्या रंगाचे मिररोर्स असणाऱ्या ड्रेसमध्ये खूप गोड दिसत आहे. जो एक ट्रेण्डी फॅशनचा ड्रेस आहे. त्यावर तिने कॉन्ट्रास्ट इअरिंग्स घातले आहेत.
अभिनेत्री ईशा केसकर हिच्या पिवळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे. या साडीवर तिने गुलाबी रंगाचं सलिव्हलेस ब्लाऊज घातला आहे आणि कानात झुमके घालून गुलाबी टिकली लावली आहे.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने नऊवारी साडीवर फोटोशूट केले आहे. ज्यावर तिने संपूर्ण गोल्डन कलरची ज्वेलरी घातली आहे. कपाळावर चंद्रकोर लावली आहे.

 

Latest Posts

Don't Miss