Shardiya Navratri 2024 : नवरात्रीच्या नऊ दिवसांत कोणत्या दिवशी कोणता रंग ? जाणून घ्या प्रत्येक रंगाचे महत्व…

Shardiya Navratri 2024 : नवरात्रीच्या नऊ दिवसांत कोणत्या दिवशी कोणता रंग ? जाणून घ्या प्रत्येक रंगाचे महत्व…

Shardiya Navratri 2024 : नवरात्री हा एक हिंदू धर्मातील प्राचीन सण आहे. नवरात्रीचा प्रत्येक रंग हा एक विशिष्ट रंगाशी संबंधित असतो. प्रत्येक रंग एक खास महत्व आणि प्रतीक दर्शवत असतो. नवरात्र उत्सवात भक्त हे खास रंग प्रत्येक दिवशी परिधान करतात.

नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग पिवळा आहे. पिवळा रंग तेजस्वी, समृद्धी, आशावाद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. त्याचबरोबर पिवळा रंग संपत्तीचेही प्रतीक मानले जाते.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचा रंग हिरवा आहे. हिरवा रंग हा सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. हा रंग स्कंदमाता देवीला प्रिय आहे .
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाचा रंग राखाडी आहे. राखाडी रंग हा पवित्रता, शांती आणि नकारात्मकतेचे उच्चाटन यांचे प्रतीक मानले जाते.
नवरात्रीच्या चौथ्या दिवसाचा रंग नारंगी आहे. नारंगी रंग हा ऊर्जा, चैतन्य आणि उत्साहाचे प्रतीक आहे. नारंगी रंग भक्तीची भावना दर्शवतो.
नवरात्रीच्या पाचव्या दिवसाचा पांढरा रंग आहे. पांढरा रंग हा शुद्धता आणि शांततेचे प्रतिक आहे. पांढरा रंग म्हणजे साफ आणि स्वछंद.
नवरात्रौत्सवात सहाव्या दिवसाचा लाल रंग आहे. लाल रंग म्हणजे दृढनिश्चय, धैर्य आणि सामर्थ्य यांचे प्रतीक मानले जाते. ब्रह्मचारिणी देवीचा लाल रंग प्रिय मानला जातो.
नवरात्रौत्सवात सातव्या दिवसाचा निळा रंग आहे. महागौरी देवीचा निळा रंग हा प्रिय आहे. निळा रंग हा दृढ निश्चय आणि सुंदरतेचा प्रतीक आहे.
नवरात्रौत्सवात आठव्या दिवसाचा गुलाबी रंग आहे. गुलाबी रंग हा सिध्दीदात्री देवीचा प्रिय रंग मानला जातो. हा रंग म्हणजे प्रेम आणि सद्भाव यांचे प्रतीक आहे.
नवरात्रौत्सवात नवव्या दिवसाचा जांभळा रंग आहे. हा रंग चंद्रघंटा देवीचा प्रिय रंग मानला जातो. जांभळा रंग हा सत्य आणि साहसाचे प्रतीक आहे.
Exit mobile version