spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शेतकरी आक्रोश मोर्चात सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचे नेतृत्व

करोडो जनतेचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात शेतकरी आक्रोश मोर्चा सध्या सुरु आहे. सुप्रिया सुळे व डॉ.अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात मोर्चाचा प्रारंभ झाला असून यावेळी सुप्रिया सुळे यांच्याकडून डोक्यावर भाजीपाल्याची टोपली घेऊन सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

शेतकरी आक्रोश मोर्चात इंदापूर येथील अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला सुप्रिया सुळे व डॉ. अमोल कोल्हे यांनी थालीनाद करत सरकारचा निषेध करून अंगणवाडी सेविकांना पाठिंबा दर्शवत त्यांच्या मागण्यांबाबत त्यांच्याशी संवाद साधला.
शेतकरी आक्रोश मोर्चाची पळसदेव गाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती, तेव्हा सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांचा आक्रोश मांडला.
छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आपण भेट दिली त्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती की, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठ्यालाही धक्का लागता कामा नये हीच शिकवण आज समोर ठेवून विरोधाभास आज समोर दिसतोय.
आपल्याकडे ऊस, पेरू, डाळिंब, लावले जातात परंतु, कदाचित भारतीय जनता पार्टीची एकच शेती महत्वाची आहे आणि ती गाजराची. एवढे मोठे मोठे आकडे फेकतात, परंतु या परिसरामध्ये कोणते उद्योगधंदे आलेत काय विकास झाला ? आजचा विकास आणि फेकले जाणारे अंक याकडे तुम्ही भविष्यकाळात गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
राज्याचे मुख्यमंत्री सांगतात हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. ते असेल तर मग दुधाला शासकीय आणि खाजगी अनुदान असे वेगवेगळे का दिले जाते ? असा सवाल आक्रोश मोर्चात विचारण्यात आला.
आपले सरकार आल्यावर सेवा, सन्मान आणि स्वाभिमान या तीन तत्त्वांवर चालेल. सेवा मायबाप जनतेची, सन्मान महिलांचा, शेतकऱ्यांचा व ज्येष्ठ नागरिकांचा आणि स्वाभिमान तुमच्या व माझ्या महाराष्ट्राचा..! आपले सरकार आल्यावर पंतप्रधानांची पहिली सही ही सरसकट कर्जमाफीची असेल.

हे ही वाचा:

डॉ. देवेंद्र फडणवीस गृह खात्यावर वचक ठेवण्यात अपयशी, NCP चा तक्रारीचा सूर

बूस्टर डोस घेण्यासाठी KDMC आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss