spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णीचा साखरपुडा थाटात संपन्न,पहा फोटोज

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) आणि ‘इंडियन आयडॉल’ (Indian Idol) फेम गायक आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोजवर चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.आनंदी-आशिषने तीन दिवसांपूर्वी त्यांचा फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर तिने मेहंदीचे फोटोज शेअर केले होते आणि आता स्वानंदी आणि आशिषचा थाटात साखरपुडा पार पडला आहे.

नुकताच अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांचा साखरपुडा पार पडला आहे.
स्वानंदी-आशिष यांनी सोशल मीडियावर आपल्या साखरपुड्याचे फोटोज चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. And We’re Engaged! असे या फोटोंना त्यांनी कॅप्शन दिले आहे.
काही दिवसांपूर्वीच स्वानंदीने तिच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
स्वानंदी- आशिष बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या या बातमीने चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
स्वानंदीने टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ती एक उत्तम अभिनेत्री आहे तर आशिष कुलकर्णी हा एक गायक आहे. त्याने अनेक रिऍलिटी शोमध्ये सहभाग नोंदवला आहे.

हे ही वाचा:

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे आज शेतकऱ्यांच्या बांधावर

पैसे न देता कॅबने प्रवास करत महिलेची Cab Driver वर दमदाटी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss