साडेतीन शक्तीपिठाचे राज्यातील एकमेव भगवती देवी मंदिर, नवरात्री निमित्त भाविकांची मोठी गर्दी

महालक्ष्मी अंबाबाई मंदिर ,कोल्हापूर हे करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई)चे मंदिर आहे.

महालक्ष्मी अंबाबाई मंदिर ,कोल्हापूर हे करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई)चे मंदिर आहे. महाराष्ट्रातील मंदिरांच्या साडेतीन शक्ती पीठांपैकी हे एक आहे. मोठ्या प्रमाणावर अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी असते. देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे. नवरात्रीमध्ये देवीच्या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. उत्सवाच्या काळात सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. साडे तीन शक्ती पिठाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते. काशी विश्वेश्वरचे मंदिर सहीत बारा ज्योतिर्लिंग ही आहेत. त्यामुळे हे मुळ आदिमाया सर्वस्याद्या त्रिगुणात्मक स्वरूपिनी भगवती महालक्ष्मीचे मंदिर आहे.

रविवार पासून नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. या उत्सवाच्या कालावधीत महाराष्ट्रामधील मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. नवरात्री उत्सवात देवीच्या जागर यात्रेला सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र राज्यातील साडेतीन शक्ती पिठाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. तुळजापूरची भवानीमाता, माहूरची रेणूका, कोल्हापूरची भगवती आणी वणीच्या सप्तश्रृंगी मातेचे दर्शन आता एकाच ठिकाणी होणार आहे.
शिर्डी आणी शिंगणापूरच्या मध्यावर अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार गावात एक देवीचं मंदिर आहे. या मंदिरांमध्ये देवीच्या साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन करता येणार आहे. नवरात्रीमध्ये या मंदिरात मोठा उत्सव असतो.
अनेक वर्षांपासून भक्तांच्या इच्छेखातर या सर्व देवींनी भक्ताला दर्शन दिल्याची या मंदिराची आख्यायीका आहे. नवरात्रीमध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येतात. तसेच मंदिर प्रशासनाने उत्सवाची जोरदार तयारी केली आहे.
हे मंदिर शनी शिंगणापूर ते शिर्डीच्या मार्गावर आहे.दररोज या मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी येतात. नवरात्री उत्सवापासून ते दसरा समाप्ती पर्यंत या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते.
Exit mobile version