देशभरात प्रसिद्ध असणारे विनोदवीर राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर लगेचच उपचारासाठी त्यांना दिल्लीतील इस्पितळात दाखल करण्यात आले. दरदिवशी तब्येतीत थोडी थोडी सुधारणा दाखवणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी तब्येत अचानक खालावली आणि आज २१ सप्टेंबर रोजी त्यांनी दिल्लीत जगाचा निरोप घेतला. राजू श्रीवास्तव हे फार प्रसिद्ध विनोदी कलाकार असले तरी फार कमी लोकांना त्यांच्या करिअरबाबत माहिती आहे. त्यामुळे आता आपण आपल्या विनोदांनी अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या या विनोदवीराच्या करिअर ग्राफवर एक नजर टाकणार आहोत: