कृष्णजन्माष्टमीला करा या पाच गोष्टींचा वापर

श्रावणातील कृष्ण पक्षातील अष्टमी ही भगवान श्रीकृष्णाची जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी श्री कृष्णाची पुजा केली जाते.

श्रावणातील कृष्ण पक्षातील अष्टमी ही भगवान श्रीकृष्णाची जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी श्री कृष्णाची पुजा केली जाते. यंदाच्या वर्षी कृष्णजमाष्टमी २ दिवस असणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये कृष्णजमाष्टमीला खूप महत्वाचे मानले जाते. या दिवशी कृष्णाला नैवेद्यमध्ये सुंठवडा, आणि गोपाळकाला हा नैवेद्य दाखवला जातो. शुभ मुहूर्तावर बालगोपाळाची पूजा केल्याने शुभफळ प्राप्त होतात असा लोकांमध्ये विश्वास आहे.

श्रावणात श्री कृष्णजमाष्टमी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. यावेळी अष्टमी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३. ३७ मिनिटांनी सुरू होईल आणि ७ सप्टेंबरला ४. १४ मिनिटांनी संपणार आहे.
भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म मध्यरात्री झाला होता.
या दिवशी कृष्णाला माखन आणि साखरेच्या मिठाईचा नैवेद्य दाखवला जातो. सुंठवडा हा नैवेद्याचा प्रकार आवर्जून बनवला जातो. सुंठवडा हासुंठ, धने, बडीशेप या सर्व गोष्टीचा मिळून बनवला जातो.
भगवान श्री कृष्णाला साखर आणि माखन खूप आवडते त्यामुळे या दिवशी नैवेद्य ,म्हणून दाखवले जाते. काही फोटोमध्ये श्रीकृष्ण माखन चोरत असतात.

श्रीकृष्णाला बासरी खूप प्रिय आहे. बासरीच्या सुरांनी त्यांनी सर्वाना वेड लावले आहे. धार्मिक कथांमध्ये असे बोले जाते, श्रीकृष्णन लहानपणापासून गाईची सेवा करायचे त्यामुळे जन्माष्टमीच्या पूजेमध्ये गौमातेची मूर्ती ठेवता येते किंवा गायीला प्रसाद देता येतो.

Exit mobile version