दररोज लॅपटॉप वापरताय ? मग ‘या’ महत्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा…

दररोज लॅपटॉप वापरताय ? मग ‘या’ महत्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा…

सध्याच्या दिवसांमध्ये लॅपटॉप एक महत्वाचे उपकरण आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत बरेचजण दैनंदिन अनेक गरजांसाठी लॅपटॉप वापरतात. ऑनलाईन काम, गाणी ऐकणे, चित्रपट बघणे, गेम्स खेळणे इत्यादी अनेक कामांसाठी लॅपटॉप वापरला जातो.

१) लॅपटॉप तासनतास वापरल्यामुळे काही विपरीत परिणाम दिसून येण्याची शक्यता असते. लॅपटॉपवर अनेक तास काम करत राहणे देखील शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.
लॅपटॉपवर बराच वेळ काम केल्यास मान आणि खांदेदुखीसारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे लॅपटॉपवर काम करताना काही गोष्टींची खबरदारी घेणे योग्य ठरेल.
लॅपटॉपवर काम करताना वेगळा कीबोर्ड आणि माउस वापरल्यास त्रास कमी होऊ शकतो. जास्त वेळ लॅपटॉपचा कीबोर्ड वापल्यास तो खराबही होण्याची शक्यता असते.
लॅपटॉपवर काम करताना प्रकाश असलेल्या ठिकाणी बसणे योग्य असते त्यामुळे तुमच्या डोळ्यांवर येणारा ताण काही प्रमाणात कमी होईल.
तसेच लॅपटॉपवर काम करताना हेडफोन किंवा इअरफोन कानात लावा म्हणजे बाजूच्या आवाजाचा त्रास होणार नाही आणि तुमचे कामही कमी वेळात पूर्ण होईल.
त्याचबरोबर वापर झाल्यावर लॅपटॉप सुरक्षित ठिकाणी ठेवावा किंवा अश्या बॅगमध्येच ठेवा जिथे लॅपटॉपसाठी एक खास कप्पा असेल ज्यामुळे लॅपटॉप सेफ राहील.
Exit mobile version