spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Valentine’s Week 2023, जाणून घ्या ७ ते १४ फेब्रुवारीपर्यंत व्हॅलंटाईन वीक कसा केला जातो साजरा

रोझ डे – ७ फेब्रुवारी – आज जगभरात (worldwide today) गुलाबाला प्रेमाचं प्रतीक (Rose is a symbol of love) मानल जात. भारतीय परंपरेत प्राचीन काळापासून गुलाबास प्रेम व्यक्त करण्यासाठी वापरतात, प्रत्येक जण आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल रंगाचा गुलाब देतात. व्हॅलेंटाईन दिनाची (Valentine’s Day) सुरवातही रोझ डे दिवशी गुलाब देऊन चालू होते.
प्रपोज डे – ८ फेब्रुवारी – व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. या वीकमध्ये निरनिराळे डे असतात. पण जोखमीचं काम म्हणजे आपल्या मनातील प्रेम व्यक्त करणे, बरेच लोक निरनिराळ्या गोष्टी प्लॅन करून आपल्या आवडत्या व्यक्तीला त्यांच्या मनातल्या भावना प्रपोज डे दिवशी सांगतात. जगभरात प्रपोज डे ८ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
चॉकलेट डे – ९ फेब्रुवारी – या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला किंवा साथीदाराला चॉकलेट देऊन तुम्ही त्याच्या बाबतीत असलेला आदर आणि प्रेम व्यक्त करू शकता,यासाठी त्या प्रिय व्यक्तीला चॉकलेट देऊन त्याचे आभार मानले जातात.
टेडी डे – १० फेब्रुवारी – या दिवशी आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून एखादा टेडी बिअर आपल्या पार्टनर ला भेट म्हणून दिला जातो. प्रेमाची विशेष आठवण म्हणून हा टेडी डे साजरा केला जातो.
हग डे – ११ फेब्रुवारी – प्रिय व्यक्तीला मिठी मारून आपलं त्याच्यावर किती प्रेम आहे हे सांगितले जाते, यासाठी हा दिवस साजरा केला जातो, न बोलता फक्त एका मिठीने समोरच्या व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करता येते.
प्रॉमिस डे – १२ फेब्रुवारी – या दिवशी जोडपे किंवा प्रेमात असणारे व्यक्ती एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याचे वचन देतात. या दिवशी एकमेकांवर असलेला विश्वास अजून पक्का होतो या दिनाचे विशेष महत्व व्हॅलेंटाईन वीक मध्ये आहे.
किस डे – १३ फेब्रुवारी – आपल्या भावना रोमँटिक आणि चांगल्या पद्धतीने व्यक्त करण्यासाठी ‘किस डे’ साजरा केला जातो, या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला ओठानी चुंबन देऊन त्याचवर आपले किती प्रेम आहे हे सांगता येते,
व्हॅलंटाईन डे – १४ फेब्रुवारी – हा दिवस म्हणजे प्रेमाचा दिवस या दिवशी आपण आपल्या सर्व प्रिय व्यक्तींना प्रेमाच्या शुभेच्छा देऊन त्याच्यावरील प्रेम व्यक्त करतो. तसेच आपल्या जवळील व्यक्तीचे आभार प्रेमाचे शब्द बोलून त्याचे आयुष्यात असलेले महत्व स्पष्ट करतो.

 

हे ही वाचा : 

Turkey Earthquake, शेकडो इमारती जमीनदोस्त, १२०० हुन अधिक लोकांचा मृत्यू

Earthquake In Turkey, ७. ९ रिश्टर स्केलच्या भूकंपानं तुर्की हादरलं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss