spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कोण आहेत Gautam Adani, जाणून घ्या थोडक्यात माहिती

गौतम अदानी (Gautam Adani) यांचा जन्म गुजरातमधील अहमदाबाद (Ahmedabad) येथे २४ जून १९६२ रोजी झाला. अदानी मध्यमवर्गीय जैन कुटुंबातील होते. सुरवातीपासून व्यवसाय करण्यात आवड होती. त्यांच्या वडिलांचे नाव शांतीलाल अदानी आणि आईचे नाव हे शांती अदानी होते.

गौतम अदानी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी घरोघरी जाऊन सायकलवरुन कपडे, साड्या विकण्याचे कार्य करायचे, अहमदाबाद मध्ये आजही जुन्या शहरांमध्ये अदानी टेक्सटाइल्सची दुकानं दिसतात.
अदानी वडील कापड व्यापारी होते. मात्र अदानी यांनी कधीच वडिलांच्या व्यवसायात सहभाग घेतला नाही.अदानी यांना ७ भावंडे होती. त्यांची आर्थिक परिस्थितीही इतकी चांगली नव्हती. त्यांच्या कुटुंबाने उदरनिर्वाहासाठी गुजरातमधील थरड येथून स्थलांतर केले व तेथून त्यांचा नवीन प्रवास सुरू झाला.

 

गौतम अदानी हे खूप मोठे उद्योजक (businessman) असले तरी त्यांचा शैक्षणिक कार्यकाळ फार कमी आहे . त्यांचे शिक्षण हे गुजरात मधील शेठ चीमणलाल नागिनदास या शाळेत झाले,त्यानंतर अदानी यांनी गुजरात विद्यापीठात बी कॉम ला प्रेवश घेतला.व्यवसायात रस असल्याने त्यांनी २ वर्षातच कॉलेज सोडले.

यावेळी त्यांची भेट मलय महादेविया यांच्याशी झाली. या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली, आजही ते दोघे एकत्र काम करतात. अहमदाबादमध्ये हवं तसं यश मिळणार नाही हे काही काळ व्यवसायकरून त्यांच्या लक्षात आले.त्यानंतर त्यांनी थेट मुंबई गाठली.
अदानी यांनी मुंबईतील महेंद्र ब्रदर्ससाठी डायमंड सॉर्टर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९८८ मध्ये अदानी इंटरप्रायजेज पाया रचला. १९९५ मध्ये अदानींना गुजरातच्या मुंद्रा पोर्टचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. हेच कॉन्ट्रॅक्ट अदानींसाठी टर्निंग पॉईंट ठरलं.
अदानी यांच्या पत्नी प्रीती अदानी या दातांच्या डॉक्टर असून त्या अदानी फाउंडेशनचे नेतृत्व करतात. त्यांना करण अदानी आणि जीत अदानी अशी दोन मुले आहेत.

 

Latest Posts

Don't Miss