spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

World Tour, ‘या’ देशांमध्ये आहे व्हिजाशिवाय एन्ट्री!

परदेशी जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिजा असणे आवश्यक असते. मात्र जगात असेही काही देश आहेत जिथे तुम्ही विनाव्हिजा प्रवास करू शकता.

परदेशी जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिजा असणे आवश्यक असते. मात्र जगात असेही काही देश आहेत जिथे तुम्ही विनाव्हिजा प्रवास करू शकता. यादेशात तुम्ही व्हिजा नसतानाही जाऊन राहू शकता. फक्त पासपोर्टवर तुम्ही या देशांत फिरू शकता. म्हणजेच या देशात जाण्यासाठी तुम्हला फक्त पासपोर्टची गरज आहे, व्हिजा नसला तरी तुम्ही या देशांमध्ये जाऊन राहू शकता.

मालदीव – सुट्टीसाठी मालदीवचे नाव अनेकदा घेतले जाते. तुम्ही मालदीवमध्ये व्हिजाशिवाय ३० दिवस आरामदायी सुट्टी घालवू शकता.
नेपाळ – अनेकदा नेपाळ या देशाचे नाव तुम्ही ऐकले असेल. जर तुम्हाला पर्वतांचा देश म्हणून ओळखले जाणाऱ्या नेपाळ देशात तुम्ही ९० दिवसांसाठी व्हिजा शिवाय फिरू शकता.
श्रीलंका – बेटांनी नटलेल्या श्रीलंकेत तुम्ही व्हिजाशिवाय प्रवास करू शकता. जर तुम्हाला कमी बजेटमध्ये सर्वोत्तम लोकेशन हवे असेल तुमच्यासाठी श्रीलंका हा एक चांगला पर्याय असू शकतो.
थायलंड – अनेकांना सुट्टीसाठी थायलंड देशाला भेट द्यायची असते. जर तुम्हाला थायलंडला भेट द्यायची असेल तर तुम्ही व्हिजा ऑन अरायव्हलचा लाभ घेऊ शकता.
मॉरिशस – हिरवेगार जंगल आणि समुद्रकिनाऱ्यांनी नटलेल्या मॉरिशस देशात तुम्ही व्हिसाशिवाय प्रवास करू शकता. इथे व्हिजा ऑन अरायव्हलद्वारे तुम्हाला ६० दिवसांचा व्हिसा मिळू शकतो.
इंडोनेशिया: इंडोनेशिया हादेखील असा एक देश आहे जिथे तुम्ही व्हिसाशिवाय प्रवास करू शकता. भारतीयांना इंडोनेशियामध्ये ३० दिवसांपर्यंत राहण्यासाठी व्हिजा ऑन अरायव्हल मिळू शकतो.

हे ही वाचा:

Dharavi पुनर्विकास रखडणार? अदानी कंपनीकडे प्रकल्प देण्यास केला विरोध

अभिनेत्री Ileana D’Cruz च्या बाळाचा बाप कोण? फोटो झाले व्हायरल,म्हणाली …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss