Tuesday, October 1, 2024

Latest Posts

Shardiya Navratri 2024: राखाडी रंगाच्या सजल्या ‘या’ मराठी अभिनेत्री…यंदाच्या नवरात्रीत तुम्हीही करू शकता असा सुंदर लूक

सध्या नवरात्री हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या दिवसात नऊ रंगांना विशेष स्थान दिलं जातं. सगळ्या स्त्रिया या दिवसांत प्रत्येक दिवशीच्या रंगानुसार पेहराव परिधान करतात. त्यातलाच एक रंग म्हणजे राखाडी रंग. राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो.

यावर्षी शारदीय नवरात्री ३ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस भक्त दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करतात आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील करतात. असे मानले जाते की, दुर्गा देवीची नऊ दिवस भक्तिभावाने पूजा केल्याने ती आनंदी होते आणि भक्तांचे सर्व त्रास दूर होतात. नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास आणि अर्चना करतात. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालण्याचे विशेष महत्व आहे. सध्या नवरात्री हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या दिवसात नऊ रंगांना विशेष स्थान दिलं जातं. सगळ्या स्त्रिया या दिवसांत प्रत्येक दिवशीच्या रंगानुसार पेहराव परिधान करतात. त्यातलाच एक रंग म्हणजे राखाडी रंग. राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो. हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्रोत्सवाच्या आनंद घ्यायला आवडतो.

धुराळा अभिनेत्री सई ताम्हणकरचे प्रचंड फॅन फॉलोवर्स आहेत आणि तिच्या फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत असते. अत्यंत ग्लॅमरस आणि आकर्षक असा हा राखाडी साडीतील लूक सईच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे.
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘देवयानी’ मध्ये नयनाने महत्वाची भूमिका साकारली होती. नवरात्रीच्या निमित्ताने नयना राखाडी रंगाच्या साडीसह टेम्पल ज्वेलरी परिधान करून सजली होती.
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या प्रसिद्ध मालिकेतील ज्ञानदा रामतीर्थकर हिने राखाडी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या मालिकेतील अप्पू या पत्राने सर्व प्रेक्षकांची मन जिंकली होती.
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध व सुपरहिट ठरलेली अभिनेत्री म्हणून मृणाल दुसानिसला ओळखलं जातं. ‘तू तिथे मी’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना
सर्वांची आवडती मालिका ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी मृणाल दुसानिस हिने नवरात्रीच्या निमित्ताने राखाडी रंगाची साडी घातली आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही मराठी इंडस्ट्रीतली टॉप आणि फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाते. हिरकणी अभिनेत्रीला कोणत्याही पोशाखात लूक कसा लावायचा हे माहित आहे. तिने राखाडी रंगाची साडी घातली असून गुलाबी रंगाचा ब्लाऊज घातला आहे.

हे ही वाचा:

Shardiya Navratri 2024: यंदाच्या नवरात्रीनिमित्त बनवा खास उपवासाचा बटाटेवडा रेसिपी…

Shardiya Navratri 2024: नवरात्री का साजरी केली जाते? काय त्याचे महत्त्व? जाणून घ्या सविस्तर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss