जागतिक पर्यटन दिनानिमित्त काँग्रेसने उडवली पीएम मोदींची खिल्ली म्हणाले, ‘महागड्या विमानांतून…

ट्विटर हँडलवर पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्याचे काही फोटो ट्विट करत त्यांच्यावर टीका केली आहे.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त काँग्रेसने उडवली पीएम मोदींची खिल्ली म्हणाले, ‘महागड्या विमानांतून…

आज २७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जात आहे. परदेश दौऱ्यांमुळे चर्चेत आलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी टोकियोमध्ये गेले आहेत. दुसरीकडे, पर्यटन दिनानिमित्त विरोधी पक्ष काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्याचे काही फोटो ट्विट करत त्यांच्यावर टीका केली आहे.

काँग्रेसने जागतिक पर्यटन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना इतर देशांच्या अनेक अधिकृत भेटींसाठी शुभेच्छा देणारा संदेश लिहिला आहे. काँग्रेस पक्षाने ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींना जागतिक पर्यटन दिनाच्या शुभेच्छा देत लिहिले. तुम्ही श्रीमंतांच्या छंदांचा आनंद घेत असाल, महागड्या विमानांतून जग फिरण्याचा आनंद घेत असाल, सुरक्षितपणे उड्डाण करत रहा.

विशेष म्हणजे, माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय इतमामात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी टोकियोमध्ये हजर झाले आहेत. शिंजो यांच्या अंत्यसंस्काराच्या आधी पीएम मोदींनी पीएम फुमियो किशिदा यांची भेट घेतली. त्यानंतर ते आबे यांच्या अंत्ययात्रेला श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचले जेथे जगभरातील नेते उपस्थित होते.

दरवर्षी जागतिक पर्यटन संघटनेद्वारे २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातो. सुलभ पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन दिन साजरा केला जातो. यावर्षी ‘पर्यटनाचा पुनर्विचार’ ही जागतिक पर्यटन दिन २०२२ ची थीम आहे.

हे ही वाचा:

World Tourism Day: जगासमोर पर्यटन व्यवसायाला सावरण्याचे नवे आव्हान!

World Tourism Day : भारतातील ‘ही’ ठिकाणं देतील परदेशी पर्यटनस्थळांसारखा अनुभव…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version