देवेंद्र फडणवीसांकडे गृह खाते तर उदय सामंत होणार उद्योगमंत्री?

देवेंद्र फडणवीसांकडे गृह खाते तर उदय सामंत होणार उद्योगमंत्री?

राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालेत..पण आता सर्वांच्या नजरा लागल्यात त्या मंत्रीमंडळाकडे…नेमकं मंत्रिमंडळ कसे असणार याची चर्चा रंगलेली असताना आता गृहखाते पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी गृहखाते आपल्याकडेच ठेवले होते, त्यामुळे ते परत हे खातं आपल्याकडे घेणार असल्याच्या चर्चा आहेत. कारण गृहखातं सरकारमधील महत्त्वाचं खातं मानले जाते.देवेंद्र फडणवीस यांची मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी भेट घेतली. त्यामुळे पोलीस खात्यातंही फडणवीस गृहमंत्री होण्याची चर्चा आहे.

तर उद्योग मंत्री उदय सामंत

रत्नागिरी रिफारनरीचा प्रारंभ करण्यासाठी उद्योग खाते शिंदे गटाकडे देण्यात येणार असल्याची माहिती आहे..उदय सामंत उद्योग मंत्री होण्याची शक्यता आहे. दरम्यान सुभाष देसाई यांची विधान परिषदेची मुदत सपल्यानंतर हे खाते सहा महिन्यांनी रत्नागिरीच्या उदय सामंत यांना शिवसेना देणार होती.मात्र आता उदय सामंत शिंदे गटात सहभागी झाल्याने आताच ते उद्योग मंत्री होण्याची दाट शक्यता आहे. रत्नागिरी रिफायनरीला विरोध होऊ लागल्याने हा प्रकल्प आता बारसु येथे होणार आहे..त्याचमुळे हा रखडलेला महत्वाचा प्रकल्प सुरू करण्यासाठी जमीन अधिग्रहित करण्याच्या कामात वेग यावा यासाठी उद्योग खाते उदय सामंत यांना मिळण्याची शक्यता आहे. मिशन फत्ते करण्यासाठी उदय सामंत ओळखले जातात. त्यामुळेच राज्याच्या विकासासाठी उदय सामंत हीच शिंदे-फडणवीस यांची पसंती असू शकते.

याचसोबत भविष्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील भाजपला ताकद वाढवयाची असल्याने हे खाते आता शिंदे गटातील सामतांना मिळण्याची शक्यता

Exit mobile version