spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारत जोडो यात्रेवर होणाऱ्या खर्चाची चौकशी करावी; चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी

काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील भारत जोडा यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात यात्रा पोहोचली असून आता यात्रेवर टीका सुरू झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यात्रेच्या खर्चबाबत खळबळजनक आरोप केले आहे. त्याला काँग्रेसकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात सुरू झालेली ‘भारत जोडो'(Bharat Jodo) यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर आता भाजपकडून टीकेचा बाण सोडण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्या या ‘भारत जोडो’ यात्रेत मागील अडीच वर्षातील सत्ताकाळात केलेल्या भ्रष्टाचाराचा पैसा वापरण्यात येत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. महाराष्ट्रातील ”भारत जोडो” यात्रेत काँग्रेसच्या अधिकृत खात्यातून खर्च केला जात नसल्याचाही दावा त्यांनी केला. त्यामुळे या यात्रेवर होणाऱ्या खर्चाची चौकशी करावी अशी मागणी भाजपने केली आहे.

सोमवारी रात्री राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेने राज्यात प्रवेश केला. त्यानंतर आज सकाळी देगलूरमधून त्यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यात्रेवर टीका करताना म्हटले की, यात्रेत खर्च होणारा पैसा, काँग्रेसच्या पैसा कुठून आला, कोणी खर्च केला याची चौकशी उपमुख्यमंत्री आणि गृह विभाग सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी करावी. काँग्रेसच्या अधिकृत खात्यातून किती पैसे यात्रेसाठी वापरण्यात आले आहेत आणि प्रत्यक्षात किती यात्रेसाठी किती खर्च झाला, काँग्रेस नेत्यांनी जो खर्च केला आहे तो कुठून केला आहे हे या चौकशीत तपासले पाहिजे अशी मागणी बावनकुळे यांनी केली.

हे ही वाचा :

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर येणार हा लोकप्रिय अभिनेता

ब्रम्हास्त्र चित्रपट थिएटर मध्ये न पहिल्याचा OTT च्या प्रेक्षकांना होतोय पश्चाताप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss