मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ‘इतक्या’ जागांवर युवा सेनेचा वरचष्मा…

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ‘इतक्या’ जागांवर युवा सेनेचा वरचष्मा…

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल आज शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर जाहीर करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेचा वरचष्मा दिसून आला. 10 पैकी 5 जागांवर युवासेनेचे उमेदवारांनी विजयश्री खेचून आणला. सकाळी ९ वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या टप्प्यात वैध आणि अवैध मतांची विभागणी करुन विजयी कोटा निश्चित करण्यात आला. त्यानंतर पुढील मतमोजणीला सुरुवात झाली.

युवासेनेने या निवडणुकीत मोठं यश मिळवण्याचा दावा केला होता. आता आलेले निवडणुकीचे निकाल आणि कल पाहता युवासेनेने मोठा चमत्कार केला असं म्हटलं तर वावगं ठरू नये. राखीव गटातील युवासेनेचे 5 उमेदवार विजयी ठरले आहेत. ठाकरे गटाने जोरदार मुसंडी मारली, आता अजून किती जागा आदित्य सेना खिशात घालते याचे चित्र लगेच समोर येईल. तर दुसरीकडे खुल्या गटातीलही युवासेनेचे 5 उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आदित्य सेनेने या निवडणुकीत विरोधकांना धूळ चारल्याची जोरदार चर्चा विद्यार्थ्यांमध्ये रंगली आहे. युवा सेना ठाकरे गटाच्या शीतल देवरुखकर यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून (SC) 5498 मतं खेचून आणली. तर त्यांच्याविरोधातील उमेदवार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राजेंद्र सायगावकर यांना 1014 मते पडली. देवरुखकर यांनी एबीव्हीपीवर मात करत विजयाचा झेंडा फडकवला. तर अनुसूचित जमाती प्रवर्गात (ST) युवासेना धनराज कोहचाडे यांना 5247 मते मिळाली. तर ABVP च्या उमेदवार निशा सावरा – 918 यांना मतदान खेचण्यात यश आले नाही. त्यांना हजाराचा टप्पा गाठता आला नाही. युवासेनेचे मयूर पांचाळ आणि स्नेहा गवळी यांनी पण विजयाचा फेटा डोईवर बांधला आहे. धनराज कोहवाडे आणि शशिकांत झोरेही विजयी झाले.

मुंबईतील राजकीय वर्तुळात वर्चस्व राखण्याच्यादृष्टीने सिनेट निवडणूक (mumbai university senate election) ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या नेतृत्त्वाखालील युवासेनेने (Yuvasena) वर्चस्व राखले आहे. मात्र, यंदा भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) सिनेटची निवडणूक जिंकण्यासाठी संपूर्ण जोर लावला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या . मुंबई विद्यापीठाच्या १० नोंदणीकृत पदवीधरकांच्या जागांकरिता मंगळवारी २४ सप्टेंबर २०२४ रोजी मतदान पार पडले होते. आज या निवडणुकांची मतमोजणी केली जाणार आहे. या १० जागांवरील निवडणुकीसाठी एकूण २८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील एकूण ३८ मतदान केंद्रावर आणि ६४ बूथवर सिनेट निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीच्या मतदारांची एकूण संख्या १३,४०६ इतकी आहे. मात्र २४ सप्टेंबरला झालेल्या सिनेट निवडणुकीत एकूण मतदानाच्या फक्त ५५ टक्के मतदान झालं. या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाची युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात थेट लढत होती.

हे ही वाचा:

CM Eknath Shinde मुंबई खड्डेमुक्त करणार होते, एवढ्या गंभीर परिस्थितीत ते कुठे होते? Aaditya Thackeray यांचा सवाल

एकाच मेट्रोचं उद्घाटन करायला नरेंद्र मोदी आज सहाव्यांदा येणार होते सुप्रिया सुळे यांनी करून दिली आठवण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version