Wednesday, September 25, 2024

Latest Posts

राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल ईडीच्या जाळ्यात, मुंबईच्या घरावर ईडीची जप्ती

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीने कारवाई केलेली आहे. प्रफुल्ल पटेल यांचे मुंबईतील चार मजली घरावर ईडीने जप्ती आणली आहे. या संबंधित प्रफुल्ल पटेलची चौकशी झाली होती. मुंबईतील सीजे  हाऊस मधील चौथ्या मजल्यावरील प्रफुल्ल पटेल यांच्या घरावर ईडीने टाच आणली आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या विश्वासू इकबाल मिर्ची प्रकरणात ईडीने कारवाई केली आहे. ईडीच्या परवानगी शिवाय प्रफुल्ल पटेल यांना हे घर विकता येणार नाही.

पटेल यांचे घर असलेली बिल्डिंग ही डेव्हलप करण्यात आली होती. दरम्यान पटेल आणि त्यांचे कुटुंब हे घर सध्या वापरू शकणार आहे. मात्र त्यांची विक्री ईडीच्या परवानगी शिवाय त्यांना विकता येणार नाही. इकबाल मिर्ची याने हा फ्लॅट खरेदी केला होता. आणि त्यानंतर हा एका डेव्हलपरने डेव्हलप केल्यानंतर त्यातले काही फ्लॅट पटेल यांना विकले हा व्यवहार मनी लाँड्रीग करण्यात आल्याचा आरोप आहे.

हेही वाचा : 

“जे गेले त्यांच्या रक्तात कधीच शिवसेना नव्हती” आदित्य ठाकरेंच्या टिकेला एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

Latest Posts

Don't Miss