spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कल्याणचे जिल्हाप्रमुख विजय साळवी यांना पोलिसांकडून तडीपाराची नोटीस

काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये मोठी फुटी बघायला मिळाली. त्यानंतर खरी शिवसेना कोणाची यावर दोन्ही गटांमध्ये वाद दिसून येत आहे. त्यात आज कल्याणचे जिल्हाप्रमुख विजय साळवी यांना पोलिसांनी तडीपाराची नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. कल्याणचे जिल्हाप्रमुख विजय साळवी उर्फ बंड्या साळवी हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समर्थक आहेत. ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार राहण्याची नोटीस पोलिसांनी बजावली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी ही नोटीस बजावली आहे.

त्यामुळे खळबळ उडाली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. शिंदे गटात दाखल होण्यासाठी सगळ्यांनी आपली तत्वे, निष्ठा गहाण ठेवायच्या का असा प्रश्न जिल्हाप्रमुख साळवी यांच्यासह संतप्त शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे. तर नोटीस मिळाल्याच्या वृत्ताला साळवी यांनी दुजोरा दिला आहे.

महात्मा फुले पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत अनेक गुन्हेगारीचे प्रकार आपण केले आहेत. तुमच्याकडून परिसरातील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊन त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. तुमच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सामान्य नागरिक आपल्या विरुद्ध साक्ष, जबाब देण्यास पुढे येत नाहीत. अपराध करण्यासाठी तुम्हाला संधी मिळताच तुम्ही सार्वजनिक ठिकाणी पोलीस ठाण्यात दाखल १५ गुन्हे दाखल आहेत. यावरुन आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी स्पष्ट होत आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा भाग आणि तुम्हाला गु्न्हेगारी कृत्यापासून परावृत्त करण्यासाठी तुम्हाला ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात येत आहे, असं सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश माने पाटील यांनी नोटीसमध्ये म्हटलं आहे.

हे ही वाचा:

भारत विरुद्ध इंग्लंड लॉर्ड्स एकदिवसीय सामन्यानंतर दीप्ती शर्माच्या हुशार रनआउटवर चार्ली डीनने केला खुलासा

Shinde vs Thackeray SC Live : शिंदे गटाला कोर्टाचा दिलासा,पक्षचिन्हाबाबत निर्णय हा निवडणूक आयोगाचा असेल- कोर्ट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss