spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नवनीत रानांच्या अडचणीत वाढ, जातप्रमाणपत्रासंबंधी वॉरंटला स्थगिती देण्यासही नकार

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाने (Bombay Sessions Court) नकार दिला आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणा यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळत दणका दिला आहे. नवनीत राणा (Navneet Rana) यांनी दोषमुक्ततेसाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटला (Non-bailable warrant) स्थगिती देण्यासही नकार दिला आहे. यामुळे नवनीत राणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

खासदार नवनीत राणा यांनी शिवडी न्यायालयाच्या आदेशाला मुंबई सत्र न्यायालयात (Bombay Sessions Court) आव्हान दिलं होतं. शिवडी न्यायालयानंही नवनीत राणा यांचा दोषमुक्तीसाठीचा अर्ज यापूर्वी फेटाळला होता. खासदार नवनीत राणा यांच्यावर जात प्रमाणपत्राप्रकरणी २०१४ साली मुलूंड पोलिस (Mulund Police) ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावतीच्या (Amaravti) खासदार नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने ८ जून २०२१ रोजी रद्द केलं. शिवाय त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला. उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) आणि सुनील भालेराव (Sunil Bhalerao) यांनी नवनीत राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका २०१७ मध्ये उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या.

हे ही वाचा:

आता तुम्हीही जिंकू शकता मोफत Nothing Phone 1 फक्त २४ तासात करावे लागेल हे काम

Corona Guidelines कोरोना संदर्भात मोठी अपडेट समोर, विमानतळांवर आजपासून सुरू होणार कोरोना चाचणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss