Thursday, July 4, 2024

Latest Posts

Loksabha Speaker Election: लोकसभा अध्यक्षपदी Om Birla यांची निवड

लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि संसदमध्ये अधिवशेषणास देखील सुरवात झाली. २४ जूनपासून सुरु झालेल्या या अधिवशेषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. पहिले दोन दिवस संपूर्ण खासदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला.

लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि संसदमध्ये अधिवशेषणास देखील सुरवात झाली. २४ जूनपासून सुरु झालेल्या या अधिवशेषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. पहिले दोन दिवस संपूर्ण खासदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. पण आज मात्र लोकसभेचा अध्यक्ष निवडण्यासाठी इतिहासात ५० वर्षांपासून पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. मागील लोकसभेचे अध्यक्ष भाजपचे ओम बिर्ला आणि काँग्रेसचे खासदार के सुरेश यांच्यात ही निवडणूक रंगणार आहे.

सकाळी ११ वाजता अधिवेशन सुरु झाले आहे आणि अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे.यावेळी ओम बिर्लांच्या समर्थनार्थ १३ पक्षांकडून प्रस्ताव करण्यात आला होता. यावेळी सर्वप्रथम पंतप्रधान मोदींनी ओम बिर्लांचा प्रस्ताव मांडला. अमित शाह, जितराम मांझी, नीरज पासवान यांनी देखील ओम बिर्लांचा प्रस्ताव मांडला यानंतर नितीन गडकरी यांनी देखील अमित शाह यांच्या प्रस्तावास अनुमोदन दिले. याचबरोबर सुनील तटकरे यांनी देखील ओम बिर्लांच्या बाजूने प्रस्ताव मांडला. यानंतर अरविंद सावंत आणि सुप्रिया सुळे यांनी के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. आणि सर्वांचा अश्या प्रकारे प्रस्ताव घेत शेवटी भाजपच्या ओम बिर्ला यांना अध्यक्षपदी नेमण्यात आलं. आवाजी मतदानाने देखील ओम बिर्ला यांची अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली.

हे ही वाचा

PUNE HIT-AND-RUN: अपघाताप्रकरणी एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना केले मोठे आवाहन..

Chandrakant Patil यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर Rohit Pawar आणि Amol Mitakari संतापून म्हणाले, दादा तुम्ही….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss