महाराष्ट्र भूषण पुरस्कार दरम्यान चेंगराचेंगरी ? जितेंद्र आव्हाड

नवी मुंबई खारघर येथे आयोजित केलेल्या आप्पासाहेब धर्माधिकारी (appasaheb dharmadhikari) यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार २०२२ (maharashtra bhushan) सोहळा पार पडला. त्यावेळी अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अन्य बड्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. नवी मुंबईत आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान कार्यक्रमात उष्णतेची लाट आणि इतर आरोग्य समस्यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १४ झाली आहे, तर रुग्णालयात दाखल ७ जणांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार दरम्यान चेंगराचेंगरी ? जितेंद्र आव्हाड

नवी मुंबई खारघर येथे आयोजित केलेल्या आप्पासाहेब धर्माधिकारी (appasaheb dharmadhikari) यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार २०२२ (maharashtra bhushan) सोहळा पार पडला. त्यावेळी अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अन्य बड्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. नवी मुंबईत आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान कार्यक्रमात उष्णतेची लाट आणि इतर आरोग्य समस्यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १४ झाली आहे, तर रुग्णालयात दाखल ७ जणांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ शेअर केल आहे. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार कार्यक्रमातील उष्माघाताने लोकांचे खूप हाल झाले हे आपल्याला त्या व्हिडिओमधून दिसत आहे.

त्यावेळेस अप्पासाहेबांच्या विचारांना मानणाऱ्या सोहळ्यात असंख्य जनसमुदाय जमलेला होता. परंतु तेव्हा खूप उष्माघातामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 14 इतकी झाली. सात रुग्ण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. दरम्यान, राष्ट्रावादीचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी या घटनेबद्दल सरकारवर हल्ला चढवत घटनास्थळावरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. रविवारी खारघर परिसरातील एका मोकळ्या मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रखरखत्या उन्हात आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते, त्यापैकी बहुतांश महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी होते. रविवारी झालेल्या कार्यक्रमात उष्माघातामुळे 14 जणांचा मृत्यू झाला होता. तर आता नवी मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर आहेत. अशी माहिती समोर येत आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना महाराष्ट्र शासनाकडून ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

तसेच या घटनेनंतर महाविकास आघाडीने शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. महाराष्ट्र भूषण सोहळ्यात कितीजण मृत्यूमुखी पडले? त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला की चेंगराचेंगरीत? असा सवाल विचारला जात आहे. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाडांनी अन्य एका ट्वीटमध्ये व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओतील चेंगराचेंगरीची घटना कुठे घडली? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारले. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हणाले,संबंधित मृत्यू उष्मघाताने झाले की चेंगराचेंगरीत? या कार्यक्रमाचं आयोजन सरकारने केलं होतं, त्यामुळे लपवालपवी करू नका. दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारा. या कार्यक्रमस्थळाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्या आणि जनतेला दाखवा. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी आयोग नेमावा.” असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यामुळे आता यावर खरोखरच चौकशी लागू होणार जक असाही मुद्दा उपस्थित राहतो.

हे ही वाचा : 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित माथेरान लाईट रेल्वेवरील हेरिटेज वॉक आणि पुस्तिकेचे प्रकाशन

ठाकरेंनी मातोश्रीचं महत्त्व कमी केलं – प्रवक्ते नरेश म्हस्के

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

 

Exit mobile version