spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शीख समाजाचा शिंदे गटाच्या ‘ढाल-तलवार’ चिन्हाला विरोध

काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये मोठा बंड झाला. त्यानंतर दोन्ही गटाकडून खरी शिवसेना कोणती यासाठी वाद सुरु झाला. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव आणि ढाल तलवार चिन्ह बहाल केलं आहे. तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ढाल-तलवार चिन्हावर नांदेडच्या शीख समाजातर्फे आक्षेप घेण्यात आला आहे. सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला निवेदन पाठवलं आहे. त्रिशूळ हे धार्मिक चिन्ह असल्याकारणानं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (Shiv Sena) ते नाकारलं याप्रमाणे ढाल-तलवार हेदेखील खालसा पंथाचं धार्मिक प्रतीक आहे, त्यामुळे हे चिन्ह निवडणूक आयोगानं द्यायला नको होतं. या संदर्भातील निर्णय नाही झाला तर रणजीत सिंह न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळालेलं आहे. दुसरीकडे आयोगाने ठाकरेंना मशाल चिन्ह दिलेलं आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले आहे व ढाल तलवार चिन्ह प्रदान केलं. ढाल तलवार चिन्हावर नांदेडच्या शीख समाजातर्फे आक्षेप नोंदवण्यात आला आहे. सचखंड गुरुद्वार बोर्डाचे माजी रंजीत सिंह कामठेकर यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला निवेदन पाठवलं आहे.

ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाला मिळालेली नवीन चिन्हं वादात सापडली आहेत. ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हावर समता पक्षानं दावा केला आहे. तर शिंदे गटाला मिळालेल्या ढाल-तलवार या चिन्हावर शीख समाजानं आक्षेप घेतला आहे. शिंदे गटाला मिळालेल्या ढाल-तलवार या चिन्हावर शीख समाजानं आक्षेप घेतला आहे. खालसा समाजाच्या धार्मिक प्रतिकाशी हे चिन्ह मिळतं जुळतं असल्याने त्यांचे निवडणूक चिन्ह म्हणून वापर होऊ नये, अशी मागणी सचखंड गुरुद्वार बोर्डाचे माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी केली आहे. तसेच हे निवदेन त्यांनी निवडणूक आयोगालाही पाठवलं आहे.एकनाथ शिंदे गटानं सूर्य हे चिन्ह मागितलं होतं. मात्र ते झोराम राष्ट्रीय पक्ष आणि द्रमुकशी संबंधित असल्यानं ते देण्यात आलं नाही. तर, ढाल तलवार हे चिन्ह पीपल्स डेमोक्रॅटिक मूव्हमेंटकडे होतं. मात्र ते पक्ष २००४ ला यादीतून वगळ्यात आल्यानं शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेने’ला दोन तलवार आणि एक ढाल हे चिन्ह मिळालं.

शिंदे गटाला देण्यात आलेल्या चिन्हामध्ये दोन तलवारी आणि ढाल आहे. तळपता सूर्य हे चिन्ह शिंदे गटानं पहिल्या पसंतीस दिलं होतं. परंतु, निवडणूक आयोगानं हे चिन्ह शिंदे गटाला नाकारलं आहे. कारण उगवता सूर्य आणि तळपता सूर्य यामध्ये गोंधळ होऊ शकतो. कारण उगवता सूर्य हे पहिल्यापासूनच डीएमके पक्षाचं चिन्ह आहे. याबरोबरच मिझोराम नॅशनल पक्षाचं देखील उगवता सूर्य हे चिन्ह आहे. त्यामुळे शिंदे गटाला उगवता सूर्य हे चिन्ह नाकारण्यात आलं आहे. पण आता शिंदे गटाला देण्यात आलेल्या ढाल तलवार या चिन्हामुळेही वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे ही वाचा :

बोगस शपथपत्राप्रकरणी उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा

Diwali 2022 : यंदाच्या दिवाळीत खिशाला झळ ! फटाक्यांच्या दारात देखील वाढ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss