दावोसमध्ये राज्यासाठी १ लाख ३७ हजार कोटींचे करार, मुख्यमंत्रांची माहिती

दावोसमध्ये राज्यासाठी १ लाख ३७ हजार कोटींचे करार, मुख्यमंत्रांची माहिती

काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोस दौऱ्यावर होते. उद्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत त्या आधीच एकनाथ शिंदे हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी दावोसमध्ये झालेल्या करारबदल सांगितले. दावोसमध्ये राहण्यासाठी १ लाख ३७ हजार कोटींचा करार केला आहे. तर येत्या दोन दिवसात अजून चांगला प्रतिसाद मळेल. तर आंतराष्ट्रीय कंपन्यांनी महाराष्ट्र सरकारवर विश्वास दाखवला आहे. तर गुंतवणूकदारांना रेड कार्पेट देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

दावोसमध्ये विविध देशांचे प्रतिनिधी आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दावोसच्या परिषदेवर छाप पाहायला मिळाली. दावोसमध्ये मोदींचे आकर्षण असल्याचे आम्हाला दिसले. महाराष्ट्र हे प्रो इंडस्ट्रियल स्टेट असल्याचे आम्ही सर्वांसमोर मांडले. जे उद्योग महाराष्ट्रात येतील, त्यांना रेड कार्पेट अंथरु तसेच कर सवलत आणि विशेष पॅकेज देऊ, अशी घोषणा आम्ही दावोसमध्ये केली, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हे सरकार उद्योजकांना चालना देणारे आहे. उद्योगांसाठी आम्ही सिंगल विंडो सुरु केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

विविध देशांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी इच्छा व्यक्त करत यासाठी आवश्यक करार केले आहेत. हे सर्व करार प्रत्यक्षात आणले जाणार असून, याचा फायदा राज्यसोबत रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यासाठी होईल असा, विश्वास शिंदेंनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

हे ही वाचा:

बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्रावरून राजकारण तापलं, राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

Raj Thackeray यांचं अटक वॉरंट रद्द, ५०० रुपयांचा ठोठावला दंड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version