spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा-भाईंदर मधील 18 नगरसेवक शिंदे गटात सामील

मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे 18 विद्यमान नगरसेवक आणि शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आज शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.

मुंबई : मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे 18 विद्यमान नगरसेवक आणि शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आज शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. हे सर्व नगरसेवक आज शिंदे गटामध्ये सामील होणार आहेत. मीरा-भाईंदर शहरात गेले तेरा वर्ष शिवसेना पक्ष काम करत होता. त्याचबरोबर पक्ष वाढीसाठी प्रताप सरनाईक त्यांचा मोलाचा वाटा आहे.

पालिकेचे विद्यमान 18 नगरसेवक तसेच मीरा-भाईंदर शहरातील शिवसेनेचे नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली आहे. त्या कार्यकारणी मध्ये अनेक प्रमुख पदाधिकारी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठिंब्याने शिंदे गटांमध्ये प्रवेश करणार आहेत. नवी मुंबई, ठाणे, बदलापूर, उल्हासनगरच्या पाठोपाठ आता मीरा भाईंदर येथील नगरसेवकांनी हा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे.

हेही वाचा : 

महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या दरात कपात

प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. ईडीने सरनाईक यांची संपत्ती जप्त केली होती. त्यानंतर सरनाईक यांनी भाजप सोबत युती करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे जेव्हा बंड पुकारले त्यावेळी प्रताप सरनाईक हे शिंदे गटांमध्ये सामील झाले होते.शिंदे गटांसोबतच सरनाईक सुरतला देखील गेले होते आता शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना पाठिंबा दाखवत शिंदे गटात सामील होण्यासाठी मार्गदर्शन केले.

…तर मातोश्रीवर जाऊन त्यांची भांडी घासा निलेश राणेंचा दीपक केसरकरांना टोला

Latest Posts

Don't Miss