मुख्यमंत्र्यांसह २० मंत्री करणार जिल्हानिहाय झेंडावंदन

त्यामुळे या २० मुख्यमंत्र्यांमध्ये यावेळी जिल्हानिहाय झेंडावंदनाची जबाबदारी

मुख्यमंत्र्यांसह २० मंत्री करणार जिल्हानिहाय झेंडावंदन

मुंबई: भाजप आणि शिंदे सरकारच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा विस्तारानंतर अजूनही खातेवाटपाचा प्रश्न प्रलंबित आहे. चप्रमाणे कुठल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाकडे जाणार याचीही उत्सुकता आहे. स्वातंत्र्य दिनी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण केले जाते. मात्र पालकमंत्री नेमले नसल्याने त्याबाबत प्रश्न निर्माण झाला होता. पण या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे.

सध्या मुख्यमंत्र्यांसह एकूण २० मंत्री आहेत. त्यामुळे या २० मुख्यमंत्र्यांमध्ये यावेळी जिल्हानिहाय झेंडावंदनाची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. तर इतर सोळा जिल्ह्यांत विभागीय आयुक्त किंवा संबंधित जिल्हाधिकारी यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.

सविस्तर यादी वाचा

दरम्यान, जिल्हानिहाय ध्वजारोहणाची जबाबदारी कुठल्या मंत्र्यावर आहे, हे स्पष्ट झाल्याने याच मंत्र्यांकडे पालकमंत्रिपदही जाणार, अशी चर्चा आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Exit mobile version