शिवसेनेचे नाव आणि पक्ष मिळवण्यासाठी २००० कोटींचा सौदा, संजय राऊतांच्या आरोप

केंद्रीय निवडणूक आयोगाने ८ महिन्याच्या चर्चेनंतर नक्की शिवसेना (Shivsena) कोणाची याचा निकाल शुक्रवारी लागला आणि हा निकाल ठाकरे गटाला (Thakare Group) धक्का देणारा होता.

शिवसेनेचे नाव आणि पक्ष मिळवण्यासाठी २००० कोटींचा सौदा, संजय राऊतांच्या आरोप

केंद्रीय निवडणूक आयोगाने ८ महिन्याच्या चर्चेनंतर नक्की शिवसेना (Shivsena) कोणाची याचा निकाल शुक्रवारी लागला आणि हा निकाल ठाकरे गटाला (Thakare Group) धक्का देणारा होता. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह हे शिंदे गटाला मिळाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली होती. यावरूनच राजकरीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) निर्णय जाहीर केला आणि त्यानंतर ठाकरे गटाकडून भाजपवर आणि शिंदे गटावर जोरदार टीका केल्या जात आहे. यादरम्यानच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे आणि त्या ट्विट मध्ये थेट त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.

शिवसेना पक्षाचे चिन्ह (Symbol) आणि नाव (Name) मिळवण्यासाठी आता पर्यंत २००० कोटींचा सौदा केला आहे असे खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केले आहेत. हे १०० टक्के सत्य आहे असा दावा सुद्धा त्यांनी केला आहे. संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे आणि त्यामध्ये त्यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा फोटो शेयर केला आहे आणि त्या फोटो सोबत त्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या काही ओळी लिहिल्या आहेत “ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे…! कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली..! – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे” त्यानंतर संजय राऊत यांनी कॅप्शनही लिहिलं आहे त्यामध्ये त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर अनेक आरोप केले आहेत.

राऊत यांनी ट्विट केले आहे कि माझी १०० टक्केत खात्रीची माहिती आहे कि आता पर्यंत शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह हडपण्यासाठी आता पर्यंत २००० कोटींचा सौदा करण्यात आला आहे आणि हे १०० टक्के सत्य आहे आणि मी बऱ्याच गोष्टी लवकरच उघड करणार आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये असे कधीच घडले नाही. शिवसेना भवन आणि शिवसेनेच्या शाखा कुठेही जाणार नाहीत उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांचे सेनापती आहेत असे वक्तव्य ठाकरे गटाच्या खासदार संजय राऊत यांनी केले आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा निर्णय शिवसेना संपवण्यासाठी वापरलेले तंत्र आहे असा आरोप राऊत यांनी केला आहे.

हे ही वाचा : 

Nagpur duronto express मधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना मोजावे लागणार जास्त पैसे, १५ जूनपासून ऑनलाईन रिझर्वेशन होणार बंद

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या मालमत्तेचे काय ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version