Andheri Election : अंधेरी पूर्व मतदारसंघात ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के मतदान, सात उमेदवार रिंगणात कोणाचा होणार विजय?

Andheri Election : अंधेरी पूर्व मतदारसंघात ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के मतदान, सात उमेदवार रिंगणात कोणाचा होणार विजय?

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज, गुरुवारी मतदान होत झाले. राज्यातील सत्तांतरानंतरची ही पहिलीच पोटनिवडणूक असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रथमच धनुष्यबाण चिन्हाऐवजी ‘मशाल’ या निवडणूक चिन्हावर लढत आहे. भाजपने उमेदवार मागे घेतल्याने आता निव्वळ औपचारिकता उरली असली तरी नव्या चिन्हाला मतदारांचा कसा कौल मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

या जागेवर ७ उमेदवार आमनेसामने आहेत. मात्र, या जागेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा रमेश लट्टे या विजयाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. ऋतुजा शिवाय रमेश लट्टे, बाला नाडर, मनोज नायक, नीना खेडेकर, फरहाना सिराज सय्यद, मिलिंद कांबळे आणि राजेश त्रिपाठी हेही या जागेवरून निवडणूक लढवत आहेत. यापैकी चार उमेदवार अपक्ष आहेत.

हेही वाचा : 

BJP : पंकजा मुंडेंना पुन्हा डावलत, चित्रा वाघ यांची महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड

‘महाराष्ट्र विधानसभेच्या १६६ अंधेरी पूर्व’ या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघातील सर्व २५६ मतदान केंद्रांवर मतदानाला सकाळी ७ वाजतापासून प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली आहे. यात दुपारी ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे. अंधेरी पूर्व मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत १६.८९ टक्के मतदान झाले होते.

अंधेरी व्यतिरिक्त मोकामा, बिहारमधील गोपालगंज, तेलंगणातील मुनुगोडे, हरियाणातील आदमपूर, उत्तर प्रदेशातील गोला गोकरनाथ, ओडिशातील धामनगर येथे निवडणूक होत आहे. पोटनिवडणूक होत असलेल्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला (भाजप) तीन, काँग्रेसला दोन आणि शिवसेना आणि राष्ट्रीय जनता दलाला (आरजेडी) प्रत्येकी एक जागा मिळाली होती. या पोटनिवडणुकांच्या निकालांचा विधानसभेतील राजकीय पक्षांच्या स्थितीवर परिणाम होणार नाही, परंतु त्यांनी ते हलके न घेता आक्रमक प्रचार केला असून, मतमोजणी ६ नोव्हेंबरला होणार आहे.

मतभेद सोडून एकत्रित येऊन आपण जनतेला न्याय दिला पाहिजे; नवनीत राणा

Exit mobile version