Friday, June 28, 2024

Latest Posts

अजितदादा गटाचे २२ आमदार संपर्कात, रोहित पवारांचा खळबळजनक दावा

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज 10 व्यां दा अर्थसंकल्प सादर करत आहेत. 2024-25 वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प ते सादर करत आहेत.

Rohit Pawar on NCP Ajit Pawar Group MLA – राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज 10 व्यां दा अर्थसंकल्प सादर करत आहेत. 2024-25 वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प ते सादर करत आहेत. एकीकडे अर्थसंकल्प सादर होणार असून दुसरीकडे रोहित पवार यांनी मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) १८-१९ आमदारांनी (NCP MLA) आमच्याशी संपर्क साधला असा दावा रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. मात्र शरद पवार त्यातल्या १० ते १२ आमदारांनाच घेतील असंही रोहित पवार म्हणाले आहेत. रोहित पवारांच्या दाव्यानंतर आता महाराष्ट्राला विधानसभेपूर्वी पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळणार की, काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जयंत पाटील विधीमंडळात होते, त्यावेळी अजित पवार गटाचे काही आमदार तिथे जाऊन त्यांना भेटल्याच्या चर्चा होत्या. अजित पवारांकडून शरद पवारांकडे किती आमदार येतील? यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, “चर्चेत तर अनेक आहेत, पण शरद पवार गटात येणाऱ्या आमदारांचा आकडा हा १८, १९, २० च्या पुढे आहे. घ्यायचं कोणाला हे शरद पवार आणि जयंत पाटील ठरवतील. काही आमदार खूप आधीपासूनच संपर्कात आहेत. त्यांना अनेक वेगळ्या गोष्टींमध्ये अडकवलं जाईल. त्यांच्या नातेवाईकांना अडकवलं जाईल, त्यामुळे काही आमदार तिकडे गेले आहेत. ते आमदार विचाराचे पक्के आहेत, पण भितीपोटी ते तिकडे गेले आहेत, अशा आमदारांचा विचार केला जाईल, असा शरद पवारांच्या स्वभावावरुन मला वाटतोय.”

त्यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार म्हणाले की, ” जयंत पाटील खूप अनुभवी नेते आहेत. त्यामुळे कसं, कधी, कोणतं कार्ड बाहेर काढायचं? हे त्यांना खूप चांगलं माहीत आहे. त्यामुळे ही फक्त सुरुवात आहे. पुढे बघा काय होतंय. शरद पवार तर, राजकारणात, महाविकास आघाडीच्या नेत्यांपेक्षाही फार पुढे आहेत हे लोकसभा निवडणुकांमध्ये साहेबांनी दाखवून दिलंच आहे. विधानसभेत तर ते आणखी जास्त दाखवतील. त्यामुळे शरद पवार आणि त्यांना जोडीला जयंत पाटील, इतर आमच्यासारखे कार्यकर्त्यांचंही स्वागत आहे. पण ज्या लोकांनी अतिपणा केला. कुठेतरी लोकांच्या विरोधात जाऊन निर्णय घेतले. अशा लोकांबाबत साहेब आणि जयंत पाटील योग्य निर्णय घेतील, असं वाटतंय. अजित पवारांना विरोध होताना पाहायला मिळतंय, पुण्यानंतर इंदापूरमध्ये एका कार्यकर्त्यानं थेट अजित पवारांचं नाव घेऊन विरोध दर्शवला. त्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, “सुरुवातीपासून आम्ही हेच सांगतोय की भाजप नेहमीच लोकनेत्याला संपवतं आणि अजित पवारांच्या बाबतीत तेच होणार आहे. आता नेतेदेखील अजित पवारांबाबत खूप बोलतात. पण ते फारसं सकारात्मक नसतं. अशातच आता कार्यकर्त्यांनाही धाडसं आलं आहे अजित पवारांबाबत बोलायला. मग आता हे ठरलंय की, मुद्दाम केलं जातंय.

हे ही वाचा:

India Vs England: टीम इंडियाची बाजी, अंतिम सामन्यासाठी खेळाडू सज्ज

कुरकुरीत भेंडी करताना ‘या’ टिप्स वापरून पाहा, नक्कीच होईल फायदा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss