spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विधानसभा निवडणुकीत मविआच्या २२५ जागा निवडून येतील – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Chandra Pawar) पक्षांमध्ये आज लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुधाकर भालेराव (Former MLA Sudhakar Bhalerao) यांनी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar, National President of Nationalist Congress Party Sharad Chandra Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबईत आज पक्षप्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Chandra Pawar) पक्षांमध्ये आज लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुधाकर भालेराव (Former MLA Sudhakar Bhalerao) यांनी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar, National President of Nationalist Congress Party Sharad Chandra Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबईत आज पक्षप्रवेश केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे, आमदार राजेश टोपे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

यावेळी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी त्या सगळ्याना सोबत घेऊ.. देशात आपले राज्य प्रगत करूयात. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या २२५ जागा निवडून येणार असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार म्हणाले की, निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यरत आहे. महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर राष्ट्रवादी पक्षाला बळ दिलं पाहिजे, असच सगळ्यांना वाटत आहे. आजच्या प्रवेशाचे वैशिष्ट्य आहे. एक उदगीरचे आणि दुसरे देवळालीचे आहेत. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार लोकांनी निवडून दिला खरा पण दोन्ही विजयी उमेदवारांनी लोकांचा घात केला. लोकांना काही गोष्टी आवडत नाहीत. तुम्ही येताना वेगळ्या नावाने मतं मागता आणि जाता दुसरीकडे हे लोकांना पटत नाही. ज्यांनी जनतेचा घात केला त्या लोकांना धडा शिकवायचा या भावनेनं अपल्याकडे यायचा निर्णय घेतला त्यांचं स्वागत करतो. असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार पुढे म्हणाले की, राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. पाच वर्षांपूर्वी विरोधी गटाचे फक्त ६ लोक निवडून आले होते. लोकांनी मोदीचे सरकार पाहिले आणि हे बदलण्याचा निर्णय घेतला. यावेळी ३१ जणांना निवडून दिलं आहे. या ३१ पैकी राष्ट्रवादीच्या १० पैकी ८ जागा निवडून आल्या आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या २८८ पैकी २२५ जागा निवडून येतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

Latest Posts

Don't Miss