माथाडी कामगारांच्या घरांसाठी २५० कोटी… – देवेंद्रा फडणवीस

माथाडी कामगारांच्या घरांसाठी २५० कोटी… – देवेंद्रा फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मोठी घोषणा केली. काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) काळात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अस्तित्वात असते, तर जवळपास दोन ते अडीच लाख मराठा तरूण उद्योजक झाले असते. आम्ही मंडळ जिवंत करून मराठा समाजाला (Maratha Community) न्याय दिला. मुंबईतील माथाडी कामगारांच्या घरांसाठी नियमाबाहेर जाऊन निर्णय घेतले. आता राहीलेले प्रश्नही सोडवू. असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

आम्ही मंडळ जिवंत करून मराठा समाजाला न्याय दिला. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी जिल्हा, तालुकांमध्ये जाऊन बैठका घेत जनजागृती केली. यामुळेच ५० हजार मराठा तरूणांना उद्योजक होण्याची संधी मिळाली. फडणवीस पुढे म्हणाले, माथाडी कामगारांच्या घरांसाठी २५० कोटी प्रविण दरेकर यांच्या मुंबई बॅंकेने द्यावेत. प्रामाणिक माथाडी कामगारांच्या केसाला धक्का लागणार नाही. पण जे कामगारांच्या नावाने खंडणी घेतात त्यांना सोडणार नाही. वसूली सम्राटांना जेलमध्ये टाकल्याशिवाय सोडणार नाही.

कोरोना काळात तुम्ही रात्री… अंबादास दानवेंचा पलटवार

महाराष्ट्रमध्ये जे मुख्यमंत्री आहेत ते साताऱ्याचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांचे माथाडी कामगारांशी घनिष्ठ संबंध आहेत. २०१४ ते २०१९ मध्ये माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न सोडवले. घरांचे, बाजार समिती, बोर्ड आधी प्रश्न सोडवले. पुन्हा एकदा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची जबाबदारी नरेंद्र पाटील यांना देण्यात यावी. फडणवीस यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे. तर मुख्यमंत्र्यांकडून नवी मुंबईत माथाडी मेळाव्यात महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, माथाडी कामगारांना काहीच कमी पडणार नाही. रोजगार, कारखाने याबद्दल आम्ही धोरणात्मक निर्णय घेतोय, हे सरकार सर्वसामान्यांचे, कामगारांचे, वारकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आहे. दोन-अडीच महिन्याचे सरकार आणि महाविकास आघाडीचे अडीच वर्षाचे सरकार यामध्ये फरक आहे.

हे ही वाचा:

Mann ki Baat: चंदीगड विमानतळाल आता ‘ या ‘ नावाने ओळखले जाणार, नरेंद्र मोदींची नवी घोषणा

पुण्यात पाकिस्तानचा ध्वज पायदळी तुडवत, शिवसेनेनी केला निषेद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version