ठाकरे गटाच्या ५० पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात प्रवेश, मुख्यमंत्री म्हणाले, हाच ट्रेंड येणाऱ्या निवडणुकीतही राहणार

काही महिन्यापूर्वी शिवसेनेत मोठा बंड हा झाला होता. शिवसेनेतील मोठा नेता म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला आणि शिवसेनेतून काढता पाय घेतला. तेव्हा झालेले बंडाचे पडसाद अजूनही राज्यात दिसून येत आहेत.

ठाकरे गटाच्या ५० पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात प्रवेश, मुख्यमंत्री म्हणाले, हाच ट्रेंड येणाऱ्या निवडणुकीतही राहणार

काही महिन्यापूर्वी शिवसेनेत मोठा बंड हा झाला होता. शिवसेनेतील मोठा नेता म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला आणि शिवसेनेतून काढता पाय घेतला. तेव्हा झालेले बंडाचे पडसाद अजूनही राज्यात दिसून येत आहेत. अनेक जिल्यामध्ये ठाकरे गटातील अनेक नेते, कार्यकर्ते हे दुसऱ्या पक्षामध्ये जाताना दिसून येत आहे. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यातून शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठमोठे धक्के बसत गेले आहेत. आज नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. तब्ब्ल ५० पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश केला आहे.

नाशिक जिल्ह्यातील ५० प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश वर्षा या निवासस्थानी पार पडला आहे. एकनाथ शिंदे यांनी या सर्व ५० पदाधिकाऱ्यांना भगवे शेले देऊन त्यांना शिंदे गटात म्हणजेच बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश दिला आहे. या ५० पदाधिकाऱ्यांमध्ये विभागप्रमुख, तालुका प्रमुखांचाही समावेश आहे. तर या झालेल्या पक्ष प्रवेशामुळे नाशिकमध्ये शिंदे गटाचं बाळ वाढलं आहे. तसेच नाशिक सह नांदेडमधील सरपंचांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील पाथरी, पूर्णा, पालम येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तसेच राष्ट्रीय समाज पक्ष, एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. आता नाशिकमध्ये ठाकरे गटापेक्षा शिंदे गटाचं वर्चस्व वाढलेलं दिसून येणार आहे. यापूर्वी देखील नाशिकमधील २ डझन नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.

यातील विशेष गोष्ट म्हणजे, ठाकरे गटातील राज्यातील पदाधिकाऱ्यांची गळती काही थांबताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाला अनेक नगरसेवकांनी रामराम केल्यानंतर आज पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का हा बसला आहे. नाशिकमधील अनेक पदाधिकारी हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यामध्ये नाशिकमधील ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख, उपमहानगरप्रमुख, विभाग प्रमुख असे ५० पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान हा पक्ष प्रवेश झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांनी ठाकरे गटासह विरोधकांवर जोरदार हल्लबोल केला आहे. ग्रामपंचायतीचे निकाल लागले आहेत. काली लोकांना सवय असते कमी कमी करून अधिक काम केल्याचे दाखवणे. आमचे ग्रामपंचायतीत सर्वाधिक सरपंच हे निवडून आले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर सरपंच हे निवडून आले आहेत याचा विरोधी पक्षांनी अर्थ हा समजून घेतला पाहिजे. जी सरपंच निवडून आले आहेत त्यांचा एक दिवस मेळावा घेतला जाईल असं एकनाथ शिंदे हे माध्यमांची बोलताना म्हणाले आहे. तसेच ते पुढे म्हणाले आहेत कि, कोणी आमच्यावर कितीही आरोप केले तरीही आमचं काम हे सुरु राहणार आहे. तुम्ही सर्व आरोप करत रहा आम्ही काम करत राहू असं म्हणत शिंदेनी विरोधकांना चिमटा हा काढला आहे. तसेच लोकमत आणि जनमत समजून घ्या. तसेच ते पुढे म्हणाले, गेलेल्यांची निवडणुकीत जिंकून दाखवा असं आव्हान दिले परंतु ग्रामपंचायतीतून जे चित्रं दिसतं तेच कायम राहील. येणाऱ्या निवडणुकीत आता हाच ट्रेंड राहणार आहे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

तसेच एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना देखील टोला लगावला आहे. नागपूरमध्ये अधिवेशनच होत नव्हतं. सरकार बदललं नसतं तर अधिवेशन झालं नसतं. तिकडे चायना आणि जापानमध्ये कोरोना आला आहे ना. पण लोकांच्या मनातील सरकार आलं आणि नागपूरमध्ये अधिवेशन घेतलं. अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्नमार्गी लावले, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.

हे ही वाचा:

राजवस्त्रे बाजूला काढा आणि या, मग दाखवतो, राऊतांचा राणेंना इशारा

Uorfi Javed – Chitra Wagh यांच्या वादात आता अंजली दमानियांची एंट्री

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात बॅनरबाजी, मॉर्डन अफजलखानाचे करायचे काय?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version