THANE | ठाण्यातील 66 माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ अनेकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे गेल्या अनेक दिवसात सामोर आले.

THANE | ठाण्यातील 66 माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला
मुंबई: शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळी नंतर त्यांच्यपाठोपाठ ४० आमदारांनी सेनेतून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मागच्या काही दिवसात राज्याच्या राजकरणात शिवसेना पक्षातू न भूतो न भविष्य असं मोठं बंड पुकारण्यात आलं. शिंदे गटाने भाजप सोबत येत नवीन सरकार स्थापन केलं. बहुमताचा ठराव ही जिंकला. तरी अजून ही अनेक नेते, आमदार आणि पदाधिकारी पक्ष सोडताना दिसत आहे. त्यामुळे पक्षाला गळती लागल्याचं चित्र सध्या पहायला मिळतंय. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ अनेकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे गेल्या अनेक दिवसात सामोर आले. आज पुन्हा एकदा ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासोबत ६६ माझी नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्याची माहिती मिळतेय.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यात नाराजीनाट्य सुरू झाले. त्यानंतर ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के ( Former Thane mayor Naresh Mhaske ) यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला. तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाण्यात पहिला राजीनामा देणारे पाहिले नरेश म्हस्के होते. आता त्यांच्यपाठोपाठ ६६ माजी नगरसेवक सुद्धा शिंदे गटात सामील झाल्याचं कळतंय.
काल शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी ही पत्राद्वारे आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सेना भवनात पदाधिकऱ्यांची बैठक घेऊन पुन्हा एकदा पक्ष बांधणीला व वाढवणीला सुरुवात केली आहे. प्रत्येक तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत पोहचण्याचे आदेश यावेळी पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
Exit mobile version