गोव्यात काँग्रेसच्या मनात धडकी, काँग्रेसचे ८ आमदार भाजपचा हात धरण्याची शक्यता

गोव्यात काँग्रेसच्या मनात धडकी, काँग्रेसचे ८ आमदार भाजपचा हात धरण्याची शक्यता

गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसच ८ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हटले जात आहे. असा दावा खुद्द भाजप गोवा अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केला आहे. ते म्हणाले, काँग्रेसचे ८ आमदार लवकरच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

अखेर शिंदेंच ठरलं, ‘आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर’ मुख्यमंत्र्यांचा निर्धार

खरं तर, गोव्यात विधानसभेच्या ४० जागा असून या वर्षी फेब्रुवारीमध्ये निवडणुका झाल्या होत्या. राज्यात भाजप आघाडीचे २५ आमदार आहेत, तर काँग्रेसचे ११ आमदार आहेत. यामधील ११ आमदार पैकी ८ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. यामध्ये दिगंबर कामत, मायकेल लोबो, राजेश फळदेसाई, केदार नाईक, संकल्प अमनोकर, अलेक्सिओ सिक्वेरा, रुडॉल्फ फर्नांडिस यांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

सामान्यांना दिलासा, देशात खाद्यतेलाच्या किंमती मोठी घसरण

काँग्रेस विधिमंडळ गट भाजपमध्ये विलीन करण्याच्या हालचाली गेल्या अनेक दिवसांपासून चालू होता. जुलैमध्ये विधानसभा अधिवेशन तोंडावर असताना दिगंबर कामत व मायकल लोबो यांनी यासाठी प्रयत्न केले होते. परंतु त्यावेळी दोन तृतीयांश म्हणजे आठ आमदारांचे संख्याबळ न झाल्याने प्रयत्न निष्फळ ठरले. परंतु आता आठ आमदार एकत्र आले आहेत. यात संकल्प आमोणकर यांचाही समावेश आहे. संकल्प हे सुरुवातीपासून आपण काँग्रेसकडे निष्ठावान असल्याचे दाखवत होते. परंतु आता ते फुटीर गटासोबत आहेत.

Hindi Diwas 2022 : १४ सप्टेंबरला का साजरा केला जातो हिंदी दिवस?

Exit mobile version