spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाकरे गटाचा ८०० पानांचा रिप्लाय निवडणूक आयोगाला सादर

शिवसेना फुटी नंतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. आता या दोन गटात खरी शिवसेना कोणती याच्यावर मोठा वाद दिसून येत आहे. ठाकरे आणि शिंदे गटात सध्या शिवसेनेच्या चिन्ह साठी लढाई सुरु आहे. न्यायलयचा आदेश आल्यानंतर नियडणूक आयोगा पक्ष चिन्हा बाबत निर्णय देणार आहे. शिवसनेचं धनुष्य बाण चिन्ह कुणाला मिळणार? यासाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार होती. यासंदर्भात उद्धव ठाकरे गटाने ८०० पानांचा ई रिप्लाय आज निवडणूक आयोगाला सादर केला आहे. ठाकरे गटाचे वकील सनी जैन यांनी प्रत्यक्षात निवडणूक आयोगाला रिप्लाय सादर करून ही माहिती माध्यमांना दिली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून आज प्रत्यक्षात निवडणूक आयोगाला भेटून कोणतेही कागदपत्र सादर करण्यात आले नाही. एकनाथ शिंदे यांचा गट सातत्याने आम्हीच शिवसेना असून आमच्या बाजूने विधीमंडळ पक्षातील एकूण सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्य असल्याचं सांगत आहे. त्यामुळं शिवसेनेचं निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळावं असा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला आहे.

काल शिवसेनेच्या ठाकरे गटाने १८० प्रतिनिधींची यादी निवडणूक आयोगाला सादर केली होती.. त्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला नोटीस बजावत आज २ वाजेपर्यत आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं होतं. त्यानुसार ठाकरे गटाने आज ८०० पानांचा इ रिप्लाय निवडणूक आयोगाला सादर केला आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाची भूमिका काय असणार आहे याकडे लक्ष आहे. अंधेरी येथील पोटनिवडणुकीत शिंदे गट उमेदवार देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून ही माहिती दिली आहे.

हे ही वाचा:

Mumbai Kurla Fire: कुर्ल्यात इमारतीला भीषण आग, आगीचं कारण अद्याही अस्पष्ट, बचावकार्य सुरु

‘जातिव्यवस्थेसाठी माफी पुरेशी नाही’, मोहन भागवतांच्या ब्राह्मणांवरच्या वक्तव्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss