मुंबईत शिवसेनेला खिंडार, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील ५०० कार्यकर्त्यांचा शिंदेंना पाठिंबा

मुंबईत शिवसेनेला खिंडार, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील ५०० कार्यकर्त्यांचा शिंदेंना पाठिंबा

मुंबई वरळीमधून मोठी बातमी समोर येत आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना वरळीमध्ये मोठा धक्का बसला आहे. वरळीमधील ५०० शिवसेना कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्याच मतदारसंघातील ५०० हुन अधिक शिवसैनिकांनी आज शिंदे गटात प्रवेश केल्याने हा आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ऐन दसरा मेळाव्याच्या तोडांवर शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांनी शिंदे गटात सामील झाले आहेत. यापूर्वी देखील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या उठवानंतर शिवसेनेत सुरू झालेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेआणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यापुढे आहे.

हेही वाचा : 

Gandhi Jayanti 2022 : …म्हणून ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला, गांधी जयंती निमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट

दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्याची तयारी जोरदार सुरु आहे. त्यासाठी दोन्ही गटाकडून तयारी केली जात आहेत यासाठी विविध संकल्पना राबवली जातेय. वरळीचे माजी नगरसेवक अरविंद भोसले यांच्याकडून वेगळ्या पद्धतीने आयोजन करण्यात आलं आहे. मातोश्री ते शिवाजी पार्कपर्यंत विविध क्षेत्रातील लोक पायी चालत जाणार आहेत. यामध्ये भजनी मंडळी, वारकरी, रक्तदाते, डॉक्टर तसंच विदेशी नागरिक देखील यामध्ये सहभागी होणार आहेत. दसरा मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं देखील आवाहन या माध्यमातून केल जाणार आहे. याची रंगीत तालीम आज पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या कलानगर सिग्नल येथे होत आहे.

IND VS SA: आज रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरी टी20

दरम्यान यावर शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा धक्का नाहीये, धक्का तर आणखी बाकी आहे. अजून अनेकांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. हाच खरा जनतेचा मुख्यमंत्री अशी भावना नागरिकांची आहे. आज पहिल्यांदाच महापालिका कर्मचाऱ्यांना कोणतंही आंदोलन न करता त्यांचा हक्क मिळाला. कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री आपले वाटतात असं पावसकर यांनी म्हटलं आहे.

शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, हाताच्या कंकणाला आरसा कशाला?, शेलारांचे शिवसेनेला रोखठोक प्रत्युत्तर

Exit mobile version