जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाला चांगलाच वेग आला आहे. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत (Jalgaon zilla Dudh Sangh Election) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) मोठा धक्का बसला आहे. मुक्ताईनगर येथील मतदारसंघातून खडसेंच्या पत्नी मंदा खडसे (Manda Khadse) यांचा पराभव झाला आहे. भाजपचे उमदेवार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी मंदा खडसे यांचा ७६ मतांनी पराभव केला आहे. याबाबतची माहिती विजयी उमेदवार मंगेश चव्हाण यांनी स्वतः दिली आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार भाजप-शिंदे गट आघाडीवर आहे, तर एकनाथ खडसे यांचा गट पिछाडीवर आहे.

दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार १९ पैकी १६ जागांवर भाजप-शिंदे गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळं जिल्हा दूध संघाच्या या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत शिंदे आणि भाजप गटाची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. एकनाथ खडसे यांना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरात भाजपचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी आव्हान दिले होते. यात मंगेश चव्हाण हे ७६ मतांनी विजयी झाले आहेत.

काही दिवसांपासून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत होते. त्यामुळं जळगाव जिल्ह्याचं राजकीय वातावरण चांगलचं तापलं होतं. दूध संघ ताब्यात घेण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात रस्सीखेच होती. या दोन्ही नेत्यांमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार हे एकनाथ खडसे यांच्या विरोधात उभे ठाकले असल्याने एकनाथ खडसे हे एकटे पडल्याचं चित्र पाहायला मिळालं होते. एकूणच आजपर्यंत कोणत्याही दूध संघाची निवडणूक राजकीय आखाडा बनली नसेल अशी जळगाव दूध संघाची निवडणूक आखाडा बनली होती त्यामुळं या निवडणुकीच्या निकालाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर या निवडणुकीत एकनाथ खडसेंच्या गटाला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदा खडसेंचा पराभव झाला आहे.

हे ही वाचा : 

७५,००० कोटी रुपयांचे ‘ग्रीन एक्स्प्रेस हायवे’ पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली होणार तयार, नितीन गडकरींची नवी घोषणा

चंद्रकांत पाटीलांवर जो कोणी शाईफेक करेल, त्याला ५१ हजार रुपयांचं… ,चिथावणीखोर घोषणा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

थंडीत हिरव्या गार काकडी खाण्याचे फायदे घ्या जाणून

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version