मुंबईतील काँग्रेसचा बडा नेत्याची धडक गणपती दर्शनाला फडणवीसांच्या घरी; राजकीय वर्तुळातील चर्चाना उधाण…

मुंबईतील काँग्रेसचा बडा नेत्याची धडक गणपती दर्शनाला फडणवीसांच्या घरी; राजकीय वर्तुळातील चर्चाना उधाण…

राज्यात आगामी विधानसभा निवडनुका असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत असताना पाहायला मिळत आहेत. अश्याच परिस्थितीत मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार अमीन पटेल (Amin Patel) हे सोमवारी सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर निवासस्थानी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी धडक दिली. अमीन पटेल यांच्या या कृत्यामुळे अनेक राजकीय चर्चाना उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि संजय निरुपम (Milind Deora, Baba Siddiqui and Sanjay Nirupam )हे नेते महायुतीमध्ये सामील झाले तर आता अमीन पटेल यांचे देवेंद्र फडणवीसांची भेट घेणे यावरून तेदेखील काँग्रेस पक्षाला रामराम करणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे.

त्या भेटीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, ”मी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी दोन कारणांसाठी गेलो होतो. एक म्हणजे मी त्यांच्या घरातील गणपतीचे दर्शन घेतले. दुसरे म्हणजे १८ तारखेला ईद-ए-मिलादू नबी आहे, गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जे जुलूस काढण्यात येणार आहेत, त्याची परवानगी लोकांना हवी आहे. त्याबाबत पोलिसांकडून सहकार्य मिळावे, ही मागणी मी देवेंद्र फडणवीसांकडे करण्यासाठी त्यांची भेट घेतली.” असे ते म्हणाले.

अमीन पटेल आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया :

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमीन पटेल आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ” देवेंद्र फडणवीस फक्त गणपती दर्शनासाठी अमिन पटेल यांच्या घरी गेले होते. यात नवीन आणि राजकारणासारखे काही नाही. काल शरद पवार साहेब हे अमरीश पटेल यांच्या प्रायव्हेट हेलिपॅडला उतरले. ही तर महाराष्ट्राची संस्कृती आहे. अतिथी आला की पुष्पगुच्छ द्यावा लागतो. मात्र, काल अमरीश पटेल हे हाती तुतारी धरणार, अशा बातम्या चालवण्यात आल्या. त्या योग्य नाहीत.”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version