महायुतीवर आ.राजू पाटलांचे मोठं वक्तव्य म्हणाले, “आमची सर्वांची मनं जुळलेली, फक्त वरुन तारा जुळल्या…”

महायुतीवर आ.राजू पाटलांचे मोठं वक्तव्य म्हणाले, “आमची सर्वांची मनं जुळलेली, फक्त वरुन तारा जुळल्या…”

गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढलीय. हे नेते सतत एकत्र आल्याचं दिसून येतं आहे. यावरून आता महापालिका निवडणुकीसाठी भाजप, मनसे आणि शिंदे गट यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर तशी वेळ आली आणि राजसाहेबांचे आदेश आले तर आम्ही युतीसाठी तयार असू असं राजू पाटील म्हणाले आहे.

हेही वाचा : 

ऑक्टोबर महिन्या अखेरीच सिनेप्रेमींसाठी बॉलीवूडची खास मेजवानी, पहा ‘ही’ चित्रपटांची यादी

काय म्हणाले आमदार राजू पाटील

युती करायची की नाही हे राज साहेब ठरवतील. त्यांनी निवडणुका स्वबळावर लढावे, असे आदेश दिले आहे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे तयारी केली आहे. मात्र, साहेबांनी जर युती करायला सांगितली तर तीसुद्धा करायला आम्ही तयार आहोत. आमची सर्वांची मन जुळलेली आहेत, फक्त वरुन तारा जुळल्या की सर्व जुळून येईल, असे महत्त्वाचे विधान आमदार राजू पाटील यांनी केले आहे.दरम्यान, मनसे आमदार राजू पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महायुतीच्या चर्चांना उधाण आले आहे.

IND vs PAK: ऋषभ पंतला पाहून चाहत्यांनी ‘उर्वशी-उर्वशी’ ओरडत गोंधळ घातला, पाहा हा व्हिडिओ

दरम्यान, मनसे आमदार राजू पाटील यांनी आज सकाळी डोंबिवलीच्या फडके रोडवर तरुणांची भेट घेतली. दिवाळीचा पहिला दिवस आणि डोंबिवली तील फडकेरोड यांचे एक अतूट नाते आहे. ते या फडकेरोडवर उसळलेला जनसागर पाहून आजही पुन्हा दिसून आले. आमदार झालो तरी फडकेरोडवर आलो की जुन्या आठवणी ताज्या होतात. डोंबिवलीकर आणि फडकेरोड हे एक वेगळ समीकरण आहे, असे मत यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले.

भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी विमानाचं टेकऑफ लांबवलं? – आयुष्मान खुराणा

Exit mobile version