मंचावरुन मुख्यमंत्र्यांचा एक फोन आणि तात्काळ ७ कोटी मंजूर

मंचावरुन मुख्यमंत्र्यांचा एक फोन आणि तात्काळ ७ कोटी मंजूर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदुरबार दौऱ्यावर आहेत आणि या वेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला. सध्या एकनाथ शिंदे हे लवकर निर्णय घेण्यासाठी ओळखले जात . “माझ्या खिशाला पेन असतो, आपलं चालतं फिरतं मंत्रालय आहे” असं मुख्यमंत्री सांगतात. त्याचीच प्रचिती नंदुरबारकरांना आली. मुख्यमंत्र्यांनी भर कार्यक्रमात मंचावरुन फोन फिरवला आणि नंदुरबार नगर परिषदचा रखडलेला ७ कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करुन दिला. मुख्यमंत्र्यांच्या या तत्परतेने सभागृहात एकच जल्लोष झाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज नंदुरबार नगर परिषद नूतन इमारत उद्घाटन झालं. या कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरच्या आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली. यावेळी पालकमंत्री विजय कुमार गावित, खासदार हिना गावित, खनिकर्म मंत्री दादा भुसे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते. यावेळी शिंदे गटाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं भाषण सुरु होतं. चंद्रकांत रघुवंशी यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आठवण सांगितली. विलासराव आलेले असताना त्यांनी एक कोटी रुपयांचा निधी ३ दिवसात मंजूर केला असे सांगितले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंचावरुनच अधिकाऱ्यांना फोन लावून ७ कोटी २८ लाख रुपयांचा निधी तत्काळ मंजूर करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या या तत्परतेने उपस्थितांनी टाळ्या वाजवीत, घोषणा देत मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शैलीत नंदुरबार नगर परिषदचा रखडलेला ७ कोटी रुपयांचा निधी फोन करून मंजूर केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज नंदुरबार नगर परिषद (Nagar Parishad) नूतन इमारत उद्घाटन झालं. या कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरच्या आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली. यावेळी ते बोलत होते, ते म्हणाले, समृद्धी महामार्गासारखे अनेक मोठे प्रकल्प देखील सुरू झाले, राज्यामध्ये काही ठिकाणी गती मंदावली, किंबहुना पूर्णपणे थांबली होती, मात्र शिंदे फडणवीस सरकार स्थापन केल्यानंतर तातडीने चालना देण्याचे काम सुरू करण्यात आले. जसं केंद्राने काही पेट्रोल डिझेलमध्ये पैसे कमी केले तसेच राज्याने देखील केले पाहिजे, परंतु गेल्या अडीच वर्षांमध्ये ते केले नव्हते, परंतु आपल्या सरकार आल्या आल्या पेट्रोलमध्ये पाच रुपये, डिझेल मध्ये तीन रुपये कमी करून टाकले. लोकांना काही प्रमाणात का होईना दिलासा देण्याचं काम आपण केलं. आपल्या सरकारने एनडीआरएफच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेतला. सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवून दोन हेक्टरला मदत देण्याचा निर्णय घेतला. त्याच बरोबर सरकारने ६ हजार कोटी रुपये निधी वाटण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्या लोकांना पन्नास हजारपर्यंत प्रोत्साहन पर अनुदान देण्याचा घेतला.

हे ही वाचा :

वंदे भारत ट्रेनला बैलाची धडक, १५ मिनिटे प्रवास ठप्प

कॉमेडियन भारती सिंह आणि पती हर्ष अडचणीत? ड्रग्ज प्रकरणी NCB कडून न्यायालयात आरोपपत्र दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version