spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अर्जुन खोतकरांच्या जावयावर गुन्हा दाखल

काही दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार आणि नेते एक मागून एक वादाच्या भोवऱ्यात अडकतांना दिसत आहे. सध्या टीम इंडियाचा अंडर १९चा माजी कर्णधार विजय झोल यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. विजय झोल (Vijay Zhol) हा शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांचा जावई असल्याची माहिती मिळत आहे. क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारातून (Cryptocurrency transactions) उद्योजक असलेल्या किरण खरात यांना पिस्तूल (pistol) दाखवून धमकवल्याचा आरोप विजय झोलवर करण्यात आलाआहे. संबंधित प्रकरण समोर आल्यानंतर जालना जिल्ह्यात (Jalna District) खळबळ उडालीय. एका माजी मंत्र्याच्या जावयावर अशाप्रकारचे आरोप करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

किरण खरात (Kiran Kharat) आणि त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन विजय झोलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रिप्टो करन्सीच्या (Crypto currency) माध्यमातून विजय झोल याने काही दिवसांपूर्वी गुंतवणूक केली होती. परंतु आता या करन्सीची मार्केट व्हॅल्यू घसरल्याने आपल्याला त्यात दोषी धरुन विजय झोल आणि त्याच्या भावाने काही गुंड घरी पाठवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारदार किरण खरात यांच्याकडून करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी क्रिकेटपटू विजय झोल, त्याचा भाऊ विक्रम झोल यांच्यासह इतर १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकणावर काँग्रेस आमदार कैलास गौरंट्याल (Congress MLA Kailas Gaurantyal) यांनी सुद्धा खोतकर आणि झोल कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. खोतकर आणि झोल कुटुंबियांनी घनसावंगी तालुक्यातील मंगरुळ येथील किरण खरात यांची सुपारी दिल्याचा, गंभीर आरोप कैलास गोरंट्याल यांनी या वेळी केला आहे. खोतकर आणि झोल यांच्यावर गुन्हे दाखल करा, मोक्का लावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्याकडे करणार असल्याचं वक्तव्य कैलास गोरंट्याल यांनी केलं.

हे ही वाचा:

‘धनुष्यबाण’ कोणाचा ? उरले फक्त काही तास…

राशी भविष्य, १७ जानेवारी २०२३, आजचा दिवस मैत्रीसाठी … 

घरातल्या घरात बनवा चविष्ट दाल बाटी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss