Jitendra Awhad : आव्हाड पुन्हा अडचणीत, महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ७२ तासात दुसरा गुन्हा दाखल

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची मोठी घोषणा केली आहे.

Jitendra Awhad : आव्हाड पुन्हा अडचणीत, महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ७२ तासात दुसरा गुन्हा दाखल

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची मोठी घोषणा केली आहे. माझ्याविरुद्ध पोलिसी अत्याचार सुरु असल्याचा दावा करत आव्हाड यांनी ही घोषणा केली आहे. ‘पोलिसांनी माझ्याविरुद्ध ७२ तासात दुसरा खोटा गुन्हा दाखल केला आहे. मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार,’ असं म्हणत आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं ट्विटरवरुन जाहीर केलं आहे.

गेल्या आठवडाभरात जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेला हा दुसरा गुन्हा असून यावेळी एका ४० वर्षीय महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

मोठी बातमी! राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल ठाण्यात होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दोन प्रलंबित उड्डाणपुलांचे लोकार्पण करण्यात येणार होते. या लोकार्पण सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा स्थानिक आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते-पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंब्रा येथील उड्डाणपुलाचा हा सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे डोंबिवलीच्या दिशेने रवाना झाले. मुख्यमंत्र्यांचा ताफा डोंबिवलीकडे रवाना होण्याआधी त्या ठिकाणी उपस्थित भाजप कार्यकर्त्या रिदा रशीद यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ जात असताना आव्हाड आणि रिदा हे आमने-सामने आले आले. यावेळी आव्हाडांनी त्यांना बाजूला केले आणि आपला मार्ग मोकळा करून पुढे निघून गेले. या महिलेचा दावा आहे की, आव्हाड यांनी महिलेला चुकीच्या पद्धतीने शरीराला स्पर्श करत तिला बाजूला होण्यास सांगितले. त्यानंतर महिलेने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला. यावेळी त्यांनी तिला तक्रार दाखल करण्याचे सुचवले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस पुढील तपास करत आहेत.

याआधी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव हा मराठी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांला मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्याविरोधात ठाणे वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान वर्तक पोलिसांनी याप्रकरणी त्यांना अटक केली होती. अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी न्यायालयाने आव्हाड यांना १५ हजार रुपयांच्या जामीनावर जामीन मंजूर केला होता.

Children Day 2022 : बालदिवसानिमित्त घरच्या घरी बनवा चॉकलेट केक, जाणून घ्या रेसिपी

Exit mobile version