ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांविरोधात गुन्हा दाखल

ठाकरे गटाचं आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या विरोधात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी हा गुन्हा भास्कर जाधव यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.

ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांविरोधात गुन्हा दाखल

ठाकरे गटाचं आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या विरोधात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी हा गुन्हा भास्कर जाधव यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.

गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. १५३, ५०५ (१) (क), ५००, ५०४ कलमांतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी तक्रार भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. कुडाळमधील सभेत राणेंवर अत्यंत खालच्या दर्जाची शिवराळ भाषा वापरल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. काल आमदार वैभव नाईक यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या कारवाईविरोधात शिवसेनेनं मोर्चा काढला होता. त्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना भास्कर जाधवांनी चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबद्दल अवमानास्पद आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात (Kudal Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आज कुडाळमध्ये भाजप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. भास्कर जाधव यांनी मध्यम, लघु, सुक्ष्म खातं म्हणत नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे या तिघांवर टीका केली. नारायण राणे हे देशाचे नेते असल्याचं सांगतात पण गल्लीत त्यांना कुत्रंदेखील विचारत नाही. शिवसेनेने काही केले नाही, असं नारायण राणे म्हणतात. मग तू काय म्हशी भदरात होता? अशा शब्दात जाधव यांनी टीकास्त्र सोडलं. नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत. मात्र, त्यांच्यामुळे देशात कोकणाची लाज जात असल्याचं सांगितलं. राणेंना तामिळनाडूचा प्रश्न विचारला की, केरळचे उत्तर देतात. कोकणातून देशाला विद्वान, विचारवंत नेते मिळाले. मात्र, राणेंनी देशात कोकणाची लाज काढली असल्याची घणाघाती टीका भास्कर जाधव यांनी केली.

हे ही वाचा :

Maharashtra Municipal Corporation Election Hearing : महापालिका निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी

“मंत्रीपदाला काय करता.. मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो”; शिंदे गटातील ‘या’ आमदाराचे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version