विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावे फसवणूक, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (President Rahul Narvekar) यांच्या नावे फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावे फसवणूक, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (President Rahul Narvekar) यांच्या नावे फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. राहुल नार्वेकर यांचे नाव घेऊन एका व्यक्तीने फोन वरून पैशांची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस (Marine Drive Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदारांची परदेश वारी करणाऱ्या कंपनीकडे राहुल नार्वेकरांचे नाव घेऊन काही तोतया लोकांनी पैशांची मागणी केली होती.

आमदारांची परदेश वारी करणाऱ्या कंपनीकडे काहींनी पैसे मागितले होते. राहुल नार्वेकर यांचे नाव घेत काही तोतया व्यक्तींनी फोनवरून पैशांची मागणी केली होती. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्याला संशय आला. नंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लगेच प्रसंगवधान दाखवत फसवणूक होण्यापासून टाळली. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस स्थानकात फिर्याद दाखल करून घेतली आहे. एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीला विधानसभा आणि विधान परिषद आमदारांना परदेश वारी घडवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्यानंतर या कंपनीच्या कार्यालयात दुपारी तीन वाजताच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती शिरले. त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं नाव घेत पैशाची मागणी केली. तसेच अध्यक्षांना फोन वरून संवाद साधून देण्याचे नाटक केले. विशेष बाब म्हणजे कंपनीतील एका व्यक्तीला फोन लावून दिल्यानंतर त्याच्यासोबत बातचीत करून दिली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाने फोन करून काही तोतया व्यक्तींनी पैशाची मागणी केली. हा संशय कर्मचाऱ्यांना आल्यानंतर त्यांनी लगेच पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी दोन्ही आरोपींनी कर्मचाऱ्यास धमकी देऊन त्यांनी तिथून लगेच पळ काढला. हा सर्व प्रकार नार्वेकर यांना समजल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेतली आहे. या आरोपींविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

Bharat Ratna Lal krishna Advani : अयोध्येसाठी रथयात्रा काढून आडवाणींनी राजकारणात केली होती उलथापालथ, जाणून घ्या सविस्तर

पटकन प्रतिक्रिया देणारे गृहमंत्री आज दिसत नाही, यशोमती ठाकूर यांनी केली फडणवीसांवर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version