सामना अग्रलेखातून नरेंद्र मोदी आणि भाजपवर थेट निशाणा

राजकारणामध्ये आधी म्हणजेच १ वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे याणी बंड पुकारून शिवसेना शिंदे गट तयार केला तेव्हा त्यांच्या सोबत ४० आमदार देखील गेले आणि आता काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी बंड पुकारला तेव्हा त्यांच्या सोबत ८ आमदारांचा समावेश होता.

सामना अग्रलेखातून नरेंद्र मोदी आणि भाजपवर थेट निशाणा

राजकारणामध्ये आधी म्हणजेच १ वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे याणी बंड पुकारून शिवसेना शिंदे गट तयार केला तेव्हा त्यांच्या सोबत ४० आमदार देखील गेले आणि आता काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी बंड पुकारला तेव्हा त्यांच्या सोबत ८ आमदारांचा समावेश होता. त्यामुळे आता सत्तेमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बसलेले बघायला मिळत आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar) शपथविधीनंतर पुन्हा एकदा राज्यात अभूतपूर्व सत्तासंघर्ष उद्भवला आहे. त्यामुळे राजकारणात सर्वच पक्षामधून चर्चाना उधाण आले आहे. आणि प्रसारमाध्यमधून वृत्तपत्रांमधून सुद्धा सध्या राजकारणावर ताशेरे उठताना बघायला मिळत आहे. अशातच आज पुन्हा एकदा सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून नरेंद्र मोदींवर आणि भाजपवर पुहा एकदा निशाणा साधण्यात आला आहे. मोदी इतरांना चोर म्हणतात, पण आताच्या भाजपमध्ये (BJP) ७० -७५ टक्के लुटीचा आणि आणि चोरीचा माल आहे, असं म्हणत सामनातून थेट मोदींवर हल्ला चढवण्यात आला आहे. तसेच, भ्रष्टाचाऱ्यांना व्यापारी वृत्तीने पाठीशी घालणं हा ‘गुजरात पॅटर्न’ आहे. संपूर्ण देशात तो लागू होताना दिसतोय, असं म्हणत सामना अग्रलेखातून भाजपला टोलाही लगावण्यात आला आहे. ‘सब भूमी गोपाल की’ याप्रमाणे ‘सब चोर भाजप के’ असेच आता वाटतंय, असं म्हणत भाजपवर टीका करण्यात आली आहे. तसेच काँग्रेस म्हणजे ‘लूट की दुकान, झूठ का बाजार’ असा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानमध्ये बोलताना केला होता हे त्यांनी बरच वेळे त्यांच्या भाषणातून किन्वा घेण्यात आलेल्या सभेतून मांडताना आपण बघितले आहेच . त्यामुळे बहुतांशी पंतप्रधानांना खरं तर स्वपक्षाविषयी बोलायचे होते, पण चुकून तोंडातून काँगेसचे नाव आले. काँगेस किंवा अन्य राजकीय पक्ष ‘लूट की दुकान’ असेल तर तो लुटीचा माल विकत घेऊन भाजप आपले घर का भरत आहे? याचा खुलासा पंतप्रधान मोदी यांनी करायला हवा”, असा सवालही अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

सामना अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही फैलावर घेण्यात आलं आहे. “मुळात भाजप हाच आता राष्ट्रीय चोर बाजार झाला आहे. चोरीचा, लुटीचा माल विकत घेणारा पक्ष म्हणून तो बदनाम झाला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस हे मोदींचीच थुंकी झेलून म्हणतात, मी पुन्हा येईन, असे म्हणालो होतो. येताना दोघांना घेऊन आलो. हे दोघे म्हणजे शिंदे-अजित पवार. दोघांवर अमाप भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. म्हणजेच काय तर येताना भ्रष्टाचाराचा व लुटीचा माल घेऊन आलो, असे फडणवीस यांना सांगायचे असावे, असं देखील अग्रलेखात म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी आठ दिवसांपूर्वी म्हणाले होते, ”राष्ट्रवादी काँग्रेस हा सगळय़ात भ्रष्ट पक्ष आहे.” त्याच राष्ट्रवादी पक्षाला त्यांनी लगेच मांडीवर घेतले. आता मोदी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावरदेखील हल्ला केला. केसीआर सरकार म्हणजे सर्वात भ्रष्ट सरकार असा आरोप मोदी यांनी केला. आता आम्हाला भीती वाटते ती केसीआर पक्षाची. कारण मोदी ज्या पक्षाला भ्रष्ट मानतात तो पक्ष पुढच्या काही काळात भाजपचा मित्र बनून सत्तेत सहभागी होतो किंवा त्या भ्रष्ट पक्षात फूट पाडून त्यातला सगळय़ात भ्रष्ट गट भाजपवासी केला जातो. हाच भाजपचा राजकीय शिष्टाचार बनला आहे.”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

हे ही वाचा:

खरी राष्ट्रवादी कोणाची? शरद पवार की, अजित पवार..

अखेर तीन दिवसांनंतर अमरनाथ यात्रा पुन्हा सुरु

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version