spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Aurangabad :ठाकरेंनंतर शरद पवार यांचा दौरा सुरु असतानाचं, औरंगाबादमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. तसेच त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावरून काल दिवसभर राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु होते. याचवेळी कन्नड तालुक्यातील नादरपूर पंडित निकम या शेतकऱ्याने आत्महत्या केली.

पंडित निकम यांची नादरपूर शिवारात गट नंबर १२१ मध्ये शेती आहे. शेतात उधारीवर बियाणे आणून मका आणि कापूस पिकाची लागवड केली होती. जून-जुलै महिन्यात पाऊस चांगला झाल्याने पिके जोमात होती. कापसाला चांगला भाव मिळेल व कर्ज आणि उधारी फिटेल या आशेवर पंडित निकम यांनी जोमाने पिकांची मशागत व मेहनत केली. मात्र शेवटी परतीच्या अतिपावसाने पिकांना मोठा फटका बसला. कापूस पाण्याखाली तर मकाला कोंब फुटली.

हेही वाचा : 

Amruta Fadnavis : “भक्तीत तल्लीन व्हा…” दिवाळीच्या निमित्ताने अमृता फडणवीस यांच्या नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कन्नड तालुक्यातील नादरपूर शिवारात रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पंडित एकनाथ निकम (वय ४७) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. सतत पडत असलेल्या पावसाने पिके मातीमोल झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या पंडित यांनी लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले.

दरम्यान, रविवारी शेतात कामासाठी जातो म्हणून ते निघून गेले. मात्र तिकडेच लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन त्यांनी मृत्यूला कवटाळले. सायंकाळी डोंगरातून बकऱ्या चारून घरी परतणाऱ्या गुराख्यास निकम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी तातडीने गावात माहिती दिल्यानंतर नातेवाईक, गावकरी घटनास्थळी धावले.

या’ पदार्थाचे सेवन करून नये, वात वाढण्यास मदत होते…

आरोप प्रत्यारोपाचा खेळ

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार फोडले. तेव्हा जनतेत गेल्याशिवाय जनतेचे समर्थन मिळत नाही, हे त्यांना समजले आहे. ते आणखी किती ठिकाणी दौरा करतील याबाबत कल्पना नाही. मात्र विरोधी पक्षातील माणूस जनतेत जाऊन प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे, ही चांगली बाब आहे. उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांनी आसूड दिला. हा आसूड सत्ताधाऱ्यांवर ओढावा असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मात्र मला वाटते की पहिला आसूड त्यांच्यावरच ओढायला हवा, असे रावसाहेब दानवे म्हणाले.

Diwali 2022 : लक्ष्मीपूजन कसे केले जाते…

Latest Posts

Don't Miss