अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमागे सत्ताधारी पक्षाचा एक महिला किंवा पुरुष प्रवक्ता;विजय वडेट्टीवारांचे मोठे वक्तव्य

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची काल रात्री हत्या करण्यात आली.

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमागे सत्ताधारी पक्षाचा एक महिला किंवा पुरुष प्रवक्ता;विजय वडेट्टीवारांचे मोठे वक्तव्य

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची काल रात्री हत्या करण्यात आली. फेसबुक लाईव्ह दरम्यान त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या गोळीबारानंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या गोळीबारानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेल्या गोळीबाराने सगळीकडे खळबळ उडाली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून नावाला ही कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. हा सर्वकाही वसुलीबाज सरकारचा परिणाम आहे. राज्यात गुंडांचा मुक्त संचार असून घोसाळकर यांचे प्रकरण सत्ताधारी लोकांमुळे झाले आहे. तसेच हा सर्व पूर्व नियोजित कट आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमागे सत्ताधारी पक्षाचा एक महिला किंवा पुरुष प्रवक्ता आहे. पुढे होणाऱ्या चौकशीत त्यांचे नाव समोर येईलच. मात्र, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी अपेक्षा आहे. या मागे सत्ताधारी पक्षाचा एक नेता असून चौकशी पूर्वी मी त्याचे नाव घेणे योग्य नाही. मात्र हे नाव लवकरच सर्वांपुढे येईल.एकूणच राज्य बिहार आणि उत्तर प्रदेश पेक्षाही वाईट अवस्थेमध्ये आहे. राज्याला वाऱ्यावर सोडून सत्ता आणि संपत्तीसाठी खुर्चीचा गैरवापर केला जात आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांचा लौकिक नाहीसा झाला आहे. एक म्हणतो पकडा, तर एक म्हणतो सोडा असे चित्र सध्या आहे. त्यात राज्याचे गृहमंत्री सध्या हतबल झाले आहे. त्यांची अवस्था अडकित्यात अडकलेल्या सुपारी सारखं हे झालं आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबासोबत रवींद्र वायकर यांचे चांगले संबंध आहेत. आमदार रवींद्र वायकर हे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, सत्ताधारी पक्षांकडून केंद्रीय शक्तींचा गैरवापर आणि दबाव आणला जात आहे. रवींद्र वायकर असतील किंवा इतर कोणी, जे गेले ते काय बिना दबावाने गेले का, सर्वकाही स्पष्ट होईल, असे वडेट्टीवार म्हणाले.

हे ही वाचा: 

अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिसचा मृतदेह चर्चमध्ये दफन करण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध

महाराष्ट्राचे चरित्र सांभाळता येत नसेल तर सत्ताधाऱ्यांनी राजीनामे द्यावे; आमदार यशोमती ठाकूर यांची टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version