spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र हे ‘स्क्रिप्ट’चा भाग; संजय राऊत

मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरुन (Andheri East By Poll) गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट आणि भाजपमध्ये मोठी लढत सुरु होती. मात्र, यासर्वात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) निवडणूक बिनविरोध करण्याबाबत लिहिलेल्या पत्राने या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आणि सारंच चित्रच पालटलं. भाजपने उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती त्यांनी केली होती. त्यावर आज भाजपने उमेदवार मुरजी पटेल (Muraji Patel) यांचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बोलताना अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपला राज ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र हे ‘स्क्रिप्ट’चा भाग असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे.

मुंबई सत्र न्यायालय परिसरात आजही खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसोबत चर्चा केली. त्यावेळी बोलताना संजय राऊतांनी थेट भाजप आणि राज ठाकरेंवर आरोप केले आहेत. यावेळी शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की, ” अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर भाजपला राज ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र हे ‘स्क्रिप्ट’चाच भाग आहे. अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष ४५ हजारांच्या मताधिक्यानं जिंकणार होता. त्यामुळंच भाजपनं उमेदवार मागे घेतला. पोटनिवडणुकीत पराभवाची चाहूल लागल्यामुळे भाजपानं उमेदवारी अर्ज मागे घेतला.” तसेच, पुढे बोलताना ते म्हणाले की, “भाजपनं या मतदारसंघात वैयक्तिक सर्वे केला होता. त्यामध्ये त्यांना ऋतुजा लटके विजय होणारच यासंदर्भात माहिती मिळाली होती.”

गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रविण राऊत यांची मे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली होती. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रविण राऊत यांचं या कामासाठी म्हाडासोबत कंत्राट झालं होतं. म्हाडा भाडेकरूंना घरे न बांधताच प्रविण राऊत यांच्या कंपनीने ९ विकास कामांना ९०१ कोटींना एफएसआय विकला आणि मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. त्याच्या नावाखाली या कंपनीने १३८ कोटी रूपये जमा केले होते. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने तक्रार केल्यानंतर या कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत १०३९.७९ कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचं चौकशीत उघड झालं. त्यामधील १०० कोटी रूपये प्रविण राऊत यांच्या अकाऊंटवर जमा झाल्याचं समोर आलं आहे. ही रक्कम प्रविण राऊत यांनी जवळच्या नातेवाईकांच्या खात्यावर ट्रान्सफर केली होती. त्यातील ५५ लाख रूपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर जमा झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं आहे आणि याची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

हे ही वाचा :

‘पण त्याआधी जे घडलं ते निंदनीय…’,अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपच्या माघारीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया

भाजपाने महाराष्ट्रच्या हिताचाच निर्णय घेतला; आशिष शेलार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss