Wednesday, September 25, 2024

Latest Posts

शिवसेनेला नवा धक्का, बाळासाहेबांचा ‘हा’ विश्वासू सेवक झाला शिंदे गटात सामील

चंपासिंह थापा हे नेपाळचे असून ३० वर्षापूर्वी मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर उदरनिर्वाहासाठी छोटी-मोठी कामे करत होता.

शिवसेना आणि शिंदेगटात फूट पडल्यापासून शिवसेनेला शिवसेनेला रोज नवे धक्के बसत आहेत. वेगळ्यावेगळ्या भागातून शिवसेनेचे कार्यकर्ते शिंदेगटात सामील होताना दिसत आहेत आणि अशातच शिवसेनेला धक्का देणारी नवी बातमी समोर येत आहे. बाळासाहेबांचे सहाय्यक चंपासिंह थापा (Champasingh Thapa) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश केला आहे. बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) सर्वात विश्वासू अशी चंपासिंह थापा अशी ओळख आहे.

चंपासिंह थापा हे नेपाळचे असून ३० वर्षापूर्वी मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर उदरनिर्वाहासाठी छोटी-मोठी कामे करत होता. मुंबईच्या कबड्डीत के. टी. थापा हे नाव खूप मोठे होते. त्यानंतर के. टी. थापा भांडुपचे नगरसेवक झाले. त्यानंतर के. टी. थापांच्या सोबतीने चंपासिंह थापा मातोश्रीवर आले आणि बाळासाहेबांचा सेवेकरी बनले. चंपसिंह थापा यांचे हे पक्षांतर राजकीयदृष्ट्या जरी फारसे महत्त्वाचे नसले तरी चंपसिंह आणि ठाकरे परिवारत असणाऱ्या नात्यामुळे त्याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. चंपासिंह थापा हे बाळासाहेबांचे विश्वासू सेवक असल्यामुळे त्यांना बाळासाहेबांची सावली म्हटलं जायचं आणि त्यांच्या शिंदे गटात जाण्यामुळे ठाकरे परिवाराला मोठा धक्का बसला आहे.

चंपासिंह थापा हा बाळासाहेबांच्या जवळील अतिशय विश्वासू व्यक्ती मानली जात होती. बाळासाहेबांची सर्वप्रकारची काळजी ते घेत असत बाळासाहेबांच्या जेवणाच्या, औषधाच्या वेळांपासून मीनाताईंचे निधन झाल्यानंतर बाळासाहेबांना भावनिक आधार देण्यापर्यंत सर्वकाही चंपसिंह थापा यांनी केलंय. घरात, समारंभात, दौऱ्यावेळी चंपासिंह थापा बाळासाहेबांसोबत कायम दिसले. चंपासिंह थापा यांनी जानेवारी महिन्यात मी बाळासाहेबांनंतर देखील मातोश्रीचा सेवक आहे, असे ठामपणे सांगितले. पण आता आठ महिन्यानंतर अचानक चंपासिंह थापा हे शिंदे गटात सामिल होणे हे राजकीयदृष्ट्या धक्कादायक नसले तरी ठाकरे कुटुंबासाठी धक्कादायक आहे.

बाळासाहेबांची जीवापाड काळजी घेणारा थापा हा ठाकरे कुटुंबाचा सदस्य बनला. थापाचे कुटुंब हे नेपाळला आहे. वर्षातून थापा कुटुंबियांना भेटण्यासाठी जातो. नेपाळमध्ये शिवसेना स्थापन करण्यात चंपासिंह थापा यांची महत्त्वाची भूमिका होती.

हे ही वाचा:

‘आता फक्त मैदानात या दाखवतो’, संदिपान भुमरेंचा टोला

मराठा समाजावर गरळ ओकणाऱ्या तानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा, काँग्रेस आक्रमक नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss