मराठा आरक्षणासाठी शिंदे सरकार स्थापन करणार नवी समिती; चंद्रकांत पाटील असणार अध्यक्ष

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील (Chandrakat Patil) यांच्या अध्यक्षतेखाली ६ जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासाठी शिंदे सरकार स्थापन करणार नवी समिती; चंद्रकांत पाटील असणार अध्यक्ष

 

राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या (Maratha Reservation) सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबींबाबत अहवालातील शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करण्यासाठीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मान्यतेनुसार ही समिती गठित करण्यात आली आहे.

उपसमितीत नेमके सदस्य कोण?

या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil), ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), बंदरे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse), राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai), उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचा समावेश आहे.

शिंदे सरकार अस्तित्वात येण्याआधी आणि ठाकरे सरकारच्या हातात सत्ता असेपर्यंत ठाकरे सरकारने देखील एक उपसमिती स्थापन केली होती. या उपसमितीचे अध्यक्ष हे अशोक चव्हाण होते. तर एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील हे सदस्य होते.

हे ही वाचा:

Mahesh Bhatt : प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांचे गाजलेले वाद

वेदांत फॉक्सकॉन प्रकणावरून पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version